20.9 C
New York

Mahanand Dairy : महानंदवर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा

Published:

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महानंद डेअरीवरून (Mahanand Dairy ) राजकारण तापलं आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, गुजरातच्या मदर डेअरीकडे (Mother Dairy) महानंद डेअरीचा ताबा देण्यात आला आहे. महानंद डेअरीचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात ला आहे. ही हस्तांतरणाची प्रक्रिया प्रक्रिया 2 मे रोजी पूर्ण झाली आहे. मात्र आता ही डेअरी अमूलकडे न जाता तीमदर डेअरी या दुध व्यवसायातील मोठ्या ब्रँडकडे गेली आहे.

Mahanand Dairy डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाशी पुढील पाच वर्षासाठी करार

मिळालेल्या माहितीनुसार, महानंद डेअरी तोट्यात असल्याने राज्य सरकारने (State government) नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाशी (National Dairy Development Board) करार करत महाराष्ट्रातील महानंद डेअरीचा ताबा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटची उपकंपनी मदर डेअरीकडे दिला. राज्य सरकारने नशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाशी पुढील पाच वर्षासाठी करार केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा या प्रकरणात राजकारण तापण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महानंद डेअरीच्या हस्तांतरणावरून राजकारण सुरु होता. मात्र आता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने विरोधक कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

माकड म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर

Mahanand Dairy राज्य सरकार 253 कोटी रुपयांची मदत करणार

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि महानंद यांच्यावतीनं पुनरुज्जीवनासाठी 253.57 कोटी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकार या प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून 253 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहेत.

Mahanand Dairy गुजरातसाठी पायघड्या घालायचा म्हणून हा निर्णय?

दरम्यान आता यावरून चांगलेच राजकारण रंगेल असे दिसते. याचे कारण म्हणजे नुकतेच काही महिन्यानापूर्वी ‘महानंद’ नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला चालवायला द्यायचा असा निर्णय घेतल्यानंतर व राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर राज्यातील इतर उद्योग राज्याबाहेर जात आहेत

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img