19.7 C
New York

Subodh Bhave: सुबोध भावेचं मालिकाविश्वात कमबॅक; ‘या’ अभिनेत्रीसोबत जमली जोडी!

Published:

मराठी मनोरंजनविश्वात आपल्या कामाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच रिलीझ झालेल्या प्रोमोमध्ये सुबोधचा धमाकेदार लुक पाहायला मिळाला. सुबोधची जोडी अभिनेत्री शिवानी सोनरसोबतच (Shivani Sonar) चांगलीच जमली आहे. छोट्या पडद्यावर मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच बडे कलाकार देखील छोट्या पडद्यावर पदार्पण करताना दिसत आहेत.

ही नवी मालिका लवकरच ‘सोनी मराठी’ (Sony Marathi) वाहिनीवर सुरू होणार आहे. ‘तुला पाहते रे’ मालिकेनंतर अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याच्यासोबत ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारेल. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेचं नाव असून सुबोध आणि शिवानीची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची पहिलीच झलक ‘सोनी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे २५ वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा एकदा एकदा ताज्या करण्यात आली आहे.

ऋतुजा बागवे झळकणार हिंदी मालिकाविश्वात!

“नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची! कारण, ‘जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!” असं कॅप्शन देत वाहिनीने पहिला प्रोमो शेअर केला आहे. सुबोध-शिवानीची जोडी ऑनस्क्रीन दिसणार असल्यामुळे चाहत्यांना फार आनंद होतोय. या मालिकेतला ट्विस्ट म्हणजे सुबोध २५ वर्ष मुलाच्या लुकमध्ये दिसत आहे. आता या नवीन मालिकेत सुबोध आणि शिवानीच्या जोडीला आणखी कोणते कलाकार झळकणार हे पाहणं उत्सुतकतेचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img