21 C
New York

Nashik : ठाकरे गटाच्या ‘या’ जिल्हाप्रमुखाला तडीपारीची नोटीस

Published:

नाशिक

नाशिक (Nashik) लोकसभा (Nashik Loksabha) मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा झटका मिळाला आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना नाशिक पोलिसांनी (Nashik Police) तडीपारीची नोटीस (Dismissal Notice) दिली आहे. त्यामुळे निवडणुकीत ठाकरे गटाला हा मोठा धक्का मिळाला आहे.

ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलिसांचा तडीपारची नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे सलीम कुत्ता डान्स प्रकरणात सुधाकर बडगुजर यांचे नाव चर्चेत आले होते. ऐन निवडणुकीच्या काळात बडगुजर विरोधात तडीपाराची नोटीस काढल्याने नाशिकचे राजकारण चांगले तापण्याचे चिन्ह आहे.

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

सुधाकर बडगुजर हे नाशिक शिवसेना उबाठा गटाचे महानगर प्रमुख आहेत. सन 2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.

अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले. पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला. गेल्या 15 वर्षा पासून ते नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर ते कार्यरत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातुन महाविकास आघडीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img