मुंबई
काँग्रेसच्या संगतीत राहून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटात मुंबईतील (Mumbai Bomb Blast) शेकडो निष्पापांचे जीव घेणाऱ्या आरोपींसोबत उबाठाचा (UBT) प्रचार पाहून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला वेदना होत असतील, अशी टीका शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी केली. देशद्रोह्यांबरोबर संगनमत करुन प्रचार (Loksabha Elections) करणाऱ्या ठाकरे गटाला मुंबईकर (Mumbai) धडा (Loksabha) शिकवतील, असे वाघमारे म्हणाले.
उबाठाचे उत्तर पश्चिम मुंबई या मतदार संघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा प्रचार १९९३ च्या ब़ॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सक्रियपणे करत आहेत. त्याचबरोबर लष्कर भरतीचे पेपर फोडणारा आरोपी महेंद्र सोनावणे हा उबाठाचे शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांचा प्रचार प्रमुख आहे. भारतीय आणि लष्करात पाकिस्तानी धार्जिणे लोकांची भरती कशी करता येईल, असा या सोनावणे याचा डाव होता. हे सर्व देशद्रोही संजय राऊत यांच्यासोबत सत्कार करत फिरत आहेत, असा आरोप डॉ. वाघमारे यांनी केला.
उदधव ठाकरे राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. मात्र त्यांचे खरे स्वरुप आता समोर आले आहे. यासंबधी फोटो आणि व्हिडिओचे पुरावे आहेत. अतिरेकी लोकांना सोबत घेऊन प्रचार करणाऱ्या उबाठा यांच्या नकली शिवसेनेने आता शिवसेना हा शब्द देखील वापरु नये. उबाठाचे संबध देशद्रोहयांशी आहेत. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे उबाठाला शिवसेना हे नाव देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असे डॉ. वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
शरद पवारांनी काँग्रेस पक्षात इतर प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असे म्हटले होते. त्याबाबत बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या संदर्भात बोलणी सुरु होती. याला उद्धव ठाकरे यांचे समर्थन होते. त्यामुळेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धनुष्यबाण चिन्ह वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि उबाठातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या सर्व कारस्थानाचे सूत्रधार शरद पवार आहेत, असे डॉ. वाघमारे म्हणाले.