26.6 C
New York

Sangeet Sivan: बॉलीवूडच्या दिग्दर्शकाने घेतला अखेरचा श्वास; रितेशची भावुक पोस्ट!

Published:

बॉलीवूड दिग्दर्शक संगीत सिवन (Sangeet Sivan) यांनी घेतला अखेरचा श्वास. बुधवारी (८ मे) रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले. ‘अपना सपना मनी मनी’, ‘योद्धा’, ‘क्या कूल है हम’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे लोकप्रिय दिग्दर्शक हरपले. सिवन यांच्या निधनावर सिनेविश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


बॉलीवूडचे सुपरस्टार सनी देओल, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे यांनी सिवन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच मल्याळम मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. परंतु, संगीत सिवन यांचे धाकटे बंधू व राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमेटोग्राफर संतोष सिवन यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी सर्वांना दिली. याशिवाय अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर करत दिग्दर्शकाच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.


‘राख’ या चित्रपटापासून संगीत सिवन यांच्या कारकिर्दीला सुरु झाली होती. ज्यामध्ये आमिर खान आणि पंकज कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. सिवन यांनी या चित्रपटात निर्माता म्हणून काम केलं होतं. त्यानंतर सनी देओलच्या ‘झोर’ चित्रपटाद्वारे त्यांनी कलाविश्वात दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.

मुंबईचं ट्रॅफिक टाळण्यासाठी अभिनेत्यानी केला मेट्रोने प्रवास!


रितेश देशमुखने सिवन यांच्यासोबत ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘अपना सपना मनी-मनी’मध्ये काम केलं होतं. रितेशने खास पोस्ट करत लिहिले की, “संगीत सिवन सर…आज आपल्यात नाहीत हे ऐकून खूप दु:ख झालं. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत नवीन असता, तेव्हा खूप कमी लोक तुमच्यावर विश्वास ठेवणारी आणि तुम्हाला संधी देणारी असतात. ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’साठी मी त्यांचा कायम आभारी आहे. ते अत्यंत मृदुभाषी, नम्र आणि अद्भुत व्यक्ती होते. आज ही बातमी ऐकून मला खूप दु:ख झालं. त्यांचं कुटुंब आणि प्रियजन, त्यांची पत्नी, मुलं, भाऊ यांच्या दु:खात मी सहभागी आहे. दा…तुमची आठवण कायम येत राहील. रेस्ट इन ग्लोरी.” रितेशसोबतच अभिनेता श्रेयश तळपदे, सनी देओल यांनी सुद्धा सिवन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img