23.1 C
New York

Covid Scam : ‘या’ घोटाळ्याच्या बदल्यात प्रियांका चतुर्वेदींना खासदारकी- म्हात्रे

Published:

मुंबई

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या कोविड घोटाळ्याचे (Covid Scam) कागदपत्र देऊन प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) मुख्यमंत्र्यांशी खासदारकीची डील करत होत्या, असा गौप्यस्फोट शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी पक्षात प्रवेश न दिल्याने प्रियांका चतुर्वेदी पिसाळलेल्या नागिणीप्रमाणे वैयक्तिक टीका करत आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला.

महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात कोणताही संबंध नसताना प्रियांका चतुर्वेदींनी दावोस दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काय काय केले हे जाहीर करु, असा इशारा म्हात्रे यांनी यावेळी दिला. चतुर्वेदी यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेत्यांनी टीकेची तोफ डागली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांची पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी तडफड सुरु आहे. युती तोडून काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणारे उद्धव ठाकरे यांनी जनतेशी गद्दारी केली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या कपाळावर ‘मेरा बाप महागद्दार है‘ असे लिहायला हवे, अशी घणाघाती टीका माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे.

शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी चतुर्वेदी यांच्यावर खरमरीत टीका केली. प्रियांका चतुर्वेदी यांना लोकसभेत निवडून जायचे होते. मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने आपण निवडून येणार नाहीत, म्हणून त्या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत, अशी टीका आमदार कायंदे यांनी केली.

डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, उबाठा पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींनी गद्दारीवर बोलणं म्हणजे ‘मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली’ असा प्रकार आहे. प्रियांका चतुर्वेदींनी दिवार चित्रपटाचे उदाहरण दिले, मग सुनील शेट्टीच्या गोपी किशन सिनेमातील ‘मेरे दो दो बाप है’ हा डायलॉग त्यांना लागू होतो का, असा सवाल डॉ. वाघमारे यांनी केला. आम्ही चतुर्वेदी ताईंना अनेकदा सांगितले की बसंती इन कुत्तो के सामने मत नाच पण काय करणार बसंती शेवटी नाचलीच, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली.

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची शेलक्या शब्दात समाचार घेतला. प्रियांका चतुर्वेदी या कशा खासदार झाल्या. हे त्यांनी एकदा मनाला विचारून बघावे, असा सल्ला दिला. महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात कोणताही संबंध नसताना प्रियांका चतुर्वेदींनी दावोस दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काय काय केले हे जाहीर करु, असा इशारा म्हात्रे यांनी यावेळी दिला.कुठल्या कर्तृत्वामुळे खासदारकी मिळाली हे चतुर्वेदी यांनी सांगावे, असे आवाहन म्हात्रे यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img