8.9 C
New York

Eknath Shinde: …त्यांच्या कपाळावर ‘मेरा बाप गद्दार है…उद्धव गटाची जीभ घसरली

Published:

घाटकोपर येथे महाविकास आघाडीतर्फे संजय दिना पाटील यांची निवडणूक प्रचार सभा काल झाली. या बैठकीत ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka chaturvedi) आणि नितीन बानगुडे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेत बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रियांका चतुर्वेदीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाविकास आघाडीकडून ईशान्य-मुंबईतून संजय दिना पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये महाविकास आघाडीतर्फे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते. या सभेत बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. मात्र टीका करताना प्रियांका चतुर्वेदी यांची जीभ घसरली. प्रियांका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

कपाळावर ‘मेरा बाप गद्दार है…’ लिहिले आहे

या बैठकीत बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध चित्रपट दिवारच्या एका डॉयलॉग बोलून दाखवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर ‘मेरा बाप गद्दार है’ असे लिहिल्याचे विधान प्रियांका चतुर्वेदी यांनी केले. तसेच याच सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. तेलंगणातील एका सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधींनी अदानी-अंबानींकडून टेंपो देऊन पैसे मिळवले, त्यामुळे आता त्यांचे नाव घेणे बंद केले आहे, असे मोदी म्हणाले. मोदींच्या याच विधानाला प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा असे आरोप करतात तेव्हा त्यांना काळा पैसा कसा घ्यायचा हे माहित आहे… अशा प्रकारे टेम्पोमधून काळा पैसा घेतला गेला आहे. अदानी आणि अंबानींनी काळा पैसा दिला, तर त्यांच्यावर ईडीने छापेमारी का केली नाही? असा सवालही त्यांनी केला.

ऐन निवडणुकीत पंकजा मुंडेंची ‘ती’ ऑडिओ क्लीप व्हायरल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img