17.6 C
New York

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल

Published:

पुणे

बहुचर्चित अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल उद्या दिनांक 10 मे रोजी पुणे सत्र न्यायालय (Pune Sessions Court) देणार आहे. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 2013 मध्ये झाली होती. तब्बल 11 वर्षांनी हे प्रकरण निकाली लागत आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 ला पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. सुरुवातीला पुणे पोलिस, त्यानंतर एसटीएस आणि शेवटी सीबीआयने या सर्व हत्या प्रकरणांचा तपास केला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर 15 सप्टेंबर 2021 ला आरोप निश्चित करण्यात आले. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणात 20 साक्षीदार तपासले.

तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर आयपीसी कलम 302, 120 (B), 34 नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img