23.1 C
New York

Mumbai Traffic : मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतुकीत बदल

Published:

मुंबई

मुंबईमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मुंबईत (Mumbai) मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक (Mumbai Traffic) पोलिसांकडून वाहतुकीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहे. निवडणुकीच्या दिवशी योग्य नियोजनाच्या दृष्टिकोनातून सांताक्रुज पोलिसांनी (Santacruz Police) वाहतुकीत बदल केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सांताकुझ वाहतुक विभागाचे हद्दित काही मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. योग्य नियोजनाच्या दृष्टीने व तसेच वाहतुकीस होणारे अडथळे कमी करण्यासाठी 19 मे 24 सकाळी 7.00 ते दि. 21 मे रोजी सकाळी 7 वा. पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत.

एक दिशा मार्ग

लोकसभा निवडणुकचे अनुषंगाने उन्नत नगर नं. १, कमुबाबा रोड चौक ते गोरेगाव वाहतूक विभाग हा रस्ता १९ मे रोजी सकाळी ०७.०० ते दि. २१ मे रोजी सकाळी ०७.०० वा. पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात एक दिशा मार्ग करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

एम.जी रोडकडून उन्नत नगर नं. २ कडे येणारी वाहने ही कमुबाबा रोड चौक येथून उजवे वळण घेवून एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम) दिशेने जाणाऱ्या मार्गाचा वापर करतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img