मुंबई
महाराष्ट्रातील बहुचर्चित मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blast Case) प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट जनरल प्रसाद पुरोहित (Prasad Purohit) यांनी मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbay Sessions Court) विशेष एनआयए कोर्टात (NIA Court) जबाब नोंदवताना खळबळजनक वक्तव्य केले आहे. पुरोहित यांनी म्हटले आहे की, 2008 मधील तत्कालीन राज्य सरकार आणि युपीए (UPA) सरकारने मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blast) प्रकरणात आपल्याला अडकवण्यात आले आहे. अतिशय पद्धतशीरपणे हिंदू दहशतवाद असा प्रचार करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष येणाऱ्या कोर्टात लेखी जबाब नोंदवला आहे पुरोहित यांनी दाखल केलेल्या 23 पानाच्या लेखी जबाब मध्ये हे धक्कादाय खुलासे करण्यात आले आहे.
कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा दबाव होता. तसेच सहआयुक्त परमबीर सिंह यांनी मारहाण आणि छळ करून आपल्याला आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप करायला लावले असं पुरोहित यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात दिलेल्या 23 पानी लेखी जबाब म्हटलंय.
काय आहे प्रकरण?
29 सप्टेंबर 2008 रोजी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथील एका मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस) केल्यानंतर साल 2011 मध्ये एनआयएकडे हा तपास हस्तांतरित करण्यात आला. एनआयएनं साल 2016 मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, श्याम साहू, प्रवीण टाकल्की आणि शिवनारायण कालसांग्राला आरोपींना क्लीन चिट देऊन त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत त्यामुळे, त्यांना या प्रकरणातून सोडण्यात यावं अशी मागणी करत आरोपपत्र दाखल केलं. साल 2017 मध्ये न्यायालयानं, प्रज्ञासिंह ठाकूर यांनाही आरोपांतून वगळूत साहू, कलसांग्रा आणि टाकल्की यांना दोषमुक्त केलं.
यामध्ये पुढे राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे यांचीही या खटल्यातून मुक्तता केली गेली. यावेळी न्यायालयानं आरोपींना मकोका आरोपातून वगळलं. पुढे 30 ऑक्टोबर 2018 रोजी विशेष न्यायालयानं सात आरोपींविरुद्ध युएपीए आणि भदंविच्या कठोर कलमांतर्गत आरोप निश्चित केले. यामध्ये कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा आरोपी म्हणून समावेश आहे तर काही आरोपी अद्यापही फरार आहेय. हे आरोपनिश्चित केल्यानंतर, खटल्यातील पहिल्या साक्षीदाराच्या तपासणीसह साल 2018 मध्ये हा खटला सुरू झाला होता.