8.7 C
New York

Mahayuti : कांदे नडले, नाशिकमध्ये महायुतीत पुन्हा वांदे

Published:

नाशिक

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) जागा वाटपामधून सर्वात चर्चेत असलेला नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघात महायुतीमध्ये (Mahayuti) पुन्हा बिघाड झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar group) नेते तथा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनामाची थेट मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्ये महायुतीमध्ये वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघत उमेदवारी मिळावी याकरिता छगन भुजबळ यांनी देखील प्रयत्न केले होते. मात्र आखरीच्या क्षणी ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. छगन भुजबळ यांना महायुतीकडून मंत्रिपद मिळाले असतानादेखील तुतारीचा प्रचार करत असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले आहे.

सुहास कांदे म्हणाले की, छगन भुजबळ यांना महायुतीकडून मंत्रीपद मिळाले असतानाही ते तुतारीच्या प्रचार करत आहेत. या संदर्भातील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. जर तुम्हाला तुतारीच्या एवढा पुळका आला असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तुतारीच्या काम करा. या सर्व प्रकरणावर भाजपचे नेतेही जर गप्प असतील तर हे दुर्दैवी आहे. दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा पार पडला, यावेळी सुहास कांदे यांनी जाहीरपणे केलेल्या या आरोपांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img