3 C
New York

Mahadev App Case: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी अपडेट; १ हजार कोटींची गुंतवणूक!

Published:

अभिनेता साहिल खानच्या (Sahil Khan) अडचणीत वाढ झाली आहे. महादेव बुक बेटिंग ॲप (Mahadev App Case) प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महादेव ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणात साहिल खानला अटक करण्यात आली होती. साहिल खानवर ऑनलाइन बेटिंग एप्लीकेशन्सचे प्रमोशन केल्याचा आरोप आहे. मात्र आता, महादेव बेटिंग ॲप प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.


महादेव बेटिंग ॲप प्रकरण संबंधित १ हजार कोटींचा निधी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात आला आहे. ईडीकडून ही माहिती समोर आली आहे. याबाबत चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी सुरेश चौकानीने ही बातमी उघड केली. सुरेश चौकानीने बनावट कंपन्याच्या मार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले. याकरिता चौकानीने स्टॉक एक्सचेंज अपचा वापर केला आहे, अशी माहिती त्याने दिली आहे. ईडीने संशय व्यक्त केला की, याप्रकरणातील बनावट कंपन्या आणि बनावट डीमॅट खात्याद्वारे १ हजार कोटी रुपयांची रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळले!


याप्रकरणात साहिल खानला अटक करण्यात आली. त्याने मोठ्या संख्येने बनावट सिमकार्ड आणि बँक खाती वापर केला. त्यामुळे साहिल खानला अटक करण्यात आली. याबाबत ईडीकडून अधिक तपास सुरु आहे. अनेक अभिनेत्यांची चौकशी ईडीकडून सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?
महादेव बेटिंग या ॲप प्रकरणात कारवाई करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवण्यात आले. या बेटिंग ॲप प्रकरणात सर्व संकेतस्थळे परदेशातून नियंत्रित केली जात होती. महादेव बेटिंग ॲप या ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अभिनेता साहिल खान याचं नाव बेटिंग ॲप ऑपरेटर म्हणून एफआयआरमध्ये नाव नोंदवण्यात आलं आहे. आधीच 31 जणांविरुद्ध माटुंगा पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप आहे. याशिवाय साहिल खानवर फक्त ॲप प्रमोशनच नाही तर ॲप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img