मुंबई
लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) जसजसा पुढील टप्पा येत आहेत तसेच निवडणुकीची रंगत महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे. राज्यात सध्या तीन टप्प्यात मतदान पार पडले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. तर पाचवा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा असणारा मुंबईसह परिसरातील असणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा मुंबईत रोड शो (Mumbai Road Show) आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 15 मे रोजी मोदींचा (PM Modi) ईशान्य मुंबई रोड शो होणार आहे.
राज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला पाचव्या टप्प्याचा मतदान 20 मे रोजी होणार आहे. या पाचव्या टप्प्यात एकूण 13 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई मधील सहा जागे जिंकण्याच्या दृष्टीकोनातून भाजपच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. याच उद्दिष्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो 17 मे रोजी होणार आहे. यासंदर्भात महायुतीच्या वतीने बांद्रा येथील एमसीए येथे बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पावसकर, नितीन सरदेसाई मनीषा कायंदे उपस्थित होतो.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी 6 जागा या मुंबईत आहेत. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य यांचा मुंबईच्या सहा मतदारसंघांमध्ये समावेश आहे. भाजप मुंबई उत्तर, मुंबई ईशान्य आणि मुंबई उत्तर मध्य मधून निवडणूक लढवत असून शिवसेना शिंदे गट हा मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य येथून निवडणूक लढवत आहेत.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंतप्रधान मोदींच्या सभा वाढल्या आहेत. पीएम मोदींनी महाराष्ट्रात 16 ठिकाणी सभा घेतल्या. आतापर्यंत दोन टप्प्यात मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत मोदींच्या मुंबई दौऱ्याबाबत चर्चा झाली.