21 C
New York

Kalyan Loksabha : श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कलानी – आयलानी एकत्र

Published:

Kalyan Loksabha : कट्टर विरोधकांना एकाच मंचावर आणण्यात शिंदे यशस्वी

उल्हासनगर : उल्हासनगरमधील राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले भाजप आमदार कुमार आयलानी व पप्पू कलानी हे बुधवारी एकत्र आले. कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदारसंघातील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी ही दोघे चार तास एकाच रथातून प्रचार आणि प्रवास करतांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या दहा दिवसांवर आले असून उमेदवारांकडूनही प्रचाराचा जोर वाढला आहे. त्यासाठी चौक सभा, गृह संकुलातील रहिवाशांची भेट, प्रचार रॅली काढण्यात येत आहे. त्यात उल्हासनगर शहरातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले सर्वच स्थानिक राजकीय नेत्यांना शहराला विकासाच्या वाटेवर नेण्याच्या मुद्यावरून एकत्र बांधण्याची राजकीय यशस्वी खेळी करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यशस्वी ठरले आहेत.

हेही वाचा : मोदींच्या हातातून निवडणूक निसटली, राहुल गांधींची टीका

Kalyan Loksabha : भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा

त्यानुसार भाजप, टीम ओमी कलानी, साई पार्टीच्या तिन्ही गटांकडून शिंदे यांचा प्रचार केला जात असला तरी आपापल्या गडामध्ये प्रचार करणारे नेते प्रचार करतांना एकाच व्यासपीठावर येणे मात्र टाळत होते. मात्र, बुधवारी महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उल्हासनगर शहरातील पाचही कॅम्पमधून रथात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देणारे भाजपचे आमदार कुमार आयलानी, जिल्हा अध्यक्ष प्रदिप रामचंदानी यांच्यासोबत राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री तसेच साई पार्टीचे जीवन इदनानी, रिपाईचे भगवान भालेराव हे एकाच रथात प्रचारात सहभागी झाले होते. तर उल्हासनगर शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदु असलेले आणि भाजप, साई पार्टीचे कट्टर विरोधक असलेले पप्पू कलानी यांनीही रथावर आपली उपस्थिती लावत प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरातील राजकारणात एकमेकांना नेहमी सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणारे राजकीय विरोधक एकाच रथावर शिंदे यांचा एकत्र प्रचार करतांना पाहून अनेकांना धक्का बसला होता. त्यामुळे हे चित्र उल्हासनगर शहरातील भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देणारे ठरण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img