19.7 C
New York

Chitra Wagh : .. यामागे राजकीय हेतू आहे का? वाघ यांचा रेणुका शहाणेंना सवाल

Published:

मागील आठवडाभराच्या काळात मराठी माणसाला संतापजनक अशा दोन घटना घडल्या. एका कंपनीच्या नोकर भरतीच्या जाहिरातीत मराठी नॉट वेलकम आणि गुजराती सोसायटीत मराठी लोकांना नो एन्ट्री.. अशा त्या दोन घटना होत्या. या दोन्ही घटनांवर मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी संताप व्यक्त करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. त्यांची हीच पोस्ट आता आगामी काळातील राजकारणाची नांदी ठरली आहे. शहाणे यांच्या या पोस्टवर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी काही प्रश्न शहाणे यांना विचारले आहेत. ज्यांनी मुंबईकर कोरोनाच्या संकटात असताना करोडो रुपये लुटून खाल्ल आणि मराठी शाळांना टाळे लावले. मात्र उर्दू भवन बांधण्यासाठी अतिउत्साह दाखवला अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? यावर उघड भूमिका घेणार की राजकीय विषय म्हणून बगल देणार? असे सवाल चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंना विचारले आहेत.

CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीका

Chitra Wagh यामागे आपला राजकीय हेतू आहे का ?

आपण ट्विटमधून मतदारांना केलेल्या आव्हानाची टायमिंग पाहता यामागे आपला राजकीय हेतू आहे का हा संशोधनाचा विषय असू शकतो. आपण घाटकोपरमधील सोसायटीत स्वतः खात्री केली आहे का. कारण माझ्या माहितीनुसार त्या सोसायटीत मराठी परिवारही गुण्यागोविंदाने राहतात. आता आपणास एक प्रश्न विचारू इच्छिते कोविड काळात पीपीई किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधे टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावा मरत असताना करोडो रुपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लुटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उर्दू भवन बांधण्यात अतिउत्साह दाखवला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळं लावलं अशा व्यक्तीच्या (उद्धव ठाकरे) कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून समर्थन करता का, नसल्यास त्याबाबत उघड भूमिका कधी घेणार. आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर हेतपुरस्सर मौन बाळगणार का, असे सवाल चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंना विचारले.

किर्तीकरांच्या प्रचारात बाँम्बस्फोटातील आरोपी

Chitra Wagh काय म्हणाल्या होत्या रेणुका शहाणे ?

मराठी “not welcome” म्हणणाऱ्यांना मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमू्ल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाष किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेविरोधात मी नाही. पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img