शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackrey) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांना माकड म्हणून संबोधलं होतं. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackrey) जोरदार टीका केली आहे.उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांची भाषा पाहता त्यांच मानसिक संतुलन बिघडल आहे असं दिसतय. त्यांना एका चांगल्या मानसोपचार तज्ञाची गरज आहे. माझी विनंती आहे की उद्धव ठाकरेंनी उपचार घ्यावेत अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री शिंदे यांना दोन माकड म्हणून संबोधलं होत. त्यावर फडणवीसांनी वरील उत्तर दिलं आहे.
Devendra Fadnavis मी जास्त ओळखतो
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटलं की, त्यांना शिव्या शिव्या दुसरा सध्या काहीही सुचत नाही. जनतेने त्यांना रिजेक्ट केलेलं आहे त्यामुळे ते शिवीगाळ करण्यावर उतरले आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर उपचार करावेत, त्यांना डॉक्टरांची गरज आहे.पवार साहेबांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही या अजित पवारांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजित पवार बोलले ते तर स्पष्टच आहे. त्यांनी सांगितलं त्यात आश्चर्य आहे का? पवारसाहेबांसोबत पक्ष अजित पवारांनी उभा केला. पक्षात आपल्याला स्थान मिळणार नाही, स्थान सुप्रिया ताईंनाच देतील म्हणून ते बाहेर पडले. तसंच उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शक शरद पवार आहेत आणि त्यांच्याच इशाऱ्याने ते चालतील. पवार साहेब जे बोलतील तेच उद्धव ठाकरे करतील.
पहाटेच्या शपथविधीचं आणखी एक गुपित अजित दादांकडून उघड
Devendra Fadnavis त्यामुळे ते बाहेर पडले
शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष विलीन करण्याबद्दल वक्तव्य केलं. त्यावर फडणवीस म्हणाले, अजित पवारांनी शरद पवारांसोबत पक्ष उभा केला. परंतु, पुढे सर्व काही सुप्रिया सुळे यांना मिळणार आहे हे कळलं होत. त्यामुळे पुढे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले असंही फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी माकड आहेत, यांच्या हातात कोलीत सापडल आहे. छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. पण शिवसेना हा काय छोटा पक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आता त्या दोन माकडांना सांगतो, बाप बदलण्याची गरज मला नाही, तुम्हाला आहे. माझे वडील चोरून तुम्ही मत मागता, तुमच्या वडिलांची नावं सांगितलं तर कोण तुम्हाला दारातही उभं करणार नाही असा थेट प्रहार उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर केला होता.