3 C
New York

Crime: तीन मद्यधुंद तरुणींची पोलिसांना मारहाण

Published:

विरार

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये तीन मद्यधुंद तरुणींनी धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार (Crime) समोर आला आहे. या तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या व्हिडीओमध्ये या तरुणी मद्याच्या नशेत गोंधळ घालताना दिसत असून त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत मारहाणही केली. या मद्यधुंद तरुणींनी मारहाण करत पोलिसांचा ड्रेसही फाडला. विरारच्या पश्चिम येथील गोकुळ टाऊनशिप मधील पंखा फास्ट या बार अँड रेस्टारंटमध्ये ही घटना घडली. विरार पोलिसांनी तिन्ही तरुणींवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे.

त्यांच्या कपाळावर ‘मेरा बाप गद्दार है…उद्धव गटाची जीभ घसरली

पंखा फास्ट हे रेस्टारंटमध्ये असून यात पब देखील आहे. त्यामुळे येथे तरुण- तरुणींची मोठी गर्दी असते. पबमध्ये काही कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. याबाबत अर्नाळा सागरी पोलिसांना कॉल गेला. त्यामुळे पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आले. यावेळी दारूच्या नशेत धूत असलेल्या तीन तरुणींनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यांनी नशेत थेट शिवीगाळ करत मारहाण केली. काव्या प्रधान (२२) या तरुणीने पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली. पोलिसांचा गणवेश फाडला. हाताला चावाही घेतला. तर अश्विनी पाटील (३१) या तरुणीने महिला पोलीस शिपाई उत्कर्षा वंजारी यांचे केस ओढले. यावेळी महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर या पबमध्ये पोलीस महिलेला मदत करण्यासाठी गेल्या असता तिलाही मारहाण करण्यात आली. काव्या प्रधान हिने पोलिस हवालदार मोराळे यांनाही मारहाण केली. यातील आणखी एक तरुणी पूनम हिनेही पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केली.
या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी उत्कर्षा वंजारी यांच्या तक्रारीनुसार अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img