अंबरनाथ
अंबरनाथ (Ambernath) शहरांमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. शिवगंगा परिसरात अघोरी प्रकार करत जादूटोणा (Black Magic) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीच्या वातावरण निर्माण झाले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अंबरनाथ मध्ये एक खळबळजनक आणि अघोरी प्रकार करत जादूटोणा उघडकीस आला आहे. एका सुपामध्ये लिंबू, कुंकूसह इतर गोष्टी वाहिलेल्या आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला असून जादूटोणाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
अंबरनाथ पूर्व भागातील शिवगंगा परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर मधोमध एका सुपामध्ये अघोरी प्रकार करत जादूटोणा करण्यात आला आहे चक्क एका सुपामध्ये लिंबू,कुंकूसह इतर गोष्टी वाहिलेल सूप दोन विकृत व्यक्तीने रस्त्यावर ठेवण्यात आला होता हा संपूर्ण प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मात्र हा प्रकार पाहून काही नागरिक जमा झाले होते हे पाहून काही नागरिक घाबरून पळू लागले तर काही वाहनाने आपला रस्ता चा मार्ग बदलला मात्र ही बाब अंबरनाथ मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांना समजतात त्यानी जनजागृती करत निषेध व्यक्त करत स्वतः ते उचलून वाहत्या पाण्यात सोडून देण्यात आले होते. मात्र या प्रकाराने एकच गोंधळ उडाला आहे तर अनेकांनी या प्रकारावर भाष्य देखील करण्यात आला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अघोरी प्रकार करण्यात आल्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे. तर या अघोरी आणि जादूटोणा प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.