21 C
New York

Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीचं आणखी एक गुपित अजित दादांकडून उघड

Published:

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या चर्चा अजूनही राजकारणात सुरू आहेत. आताही अजित पवार यांनी (Ajit Pawar) हाच मुद्दा उपस्थित करत आपण शब्दाला कसे पक्के आहोत हेच सांगितलं. शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी जुन्नर तालुक्यातील केंदूर येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधी मागील आणखी एक गुपित उघड केले.

अजितदादा पुन्हा म्हणाले, कुठेतरी थांबलं पाहिजे…

Ajit Pawar पहाटेच्या शपथविधीचं आणखी एक गुपित अजित दादांकडून उघड

अजित पवार म्हणाले, एका उद्योगपतीच्या घरी सहा बैठका झाल्या. तिथून मी मुंबईला परतल्यानंतर मला साहेबांनी (शरद पवार) आपण भाजपबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर जाऊ असं सांगितलं. मी म्हणालो असं कसं आपण त्यांना शब्द दिलाय. सहा बैठकाही झाल्यात. मला शब्द मोडता नाही मोडता येणार असं मी ठामपणे सांगितलं होतं. मी त्यावेळी दिलेला शब्द पाळला. ७२ तासांसाठी का होईना पण सरकारमध्ये गेलो. ते सरकार पुढं चाललं नाही पण मी माझा शब्द पाळला होता.

ठाकरे गटाच्या ‘या’ जिल्हाप्रमुखाला तडीपारीची नोटीस

Ajit Pawar ८० वर्षांनंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी.

शरद पवार आमचं दैवत आहेत. यात कुणाचच दुमत असण्याचं काही कारण नाही. पण कुठेतरी वेळ असते. ८० वर्षांनंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी. कुणी म्हणतं या वयात साहेबांना सोडायला नको होतं. खरंतर मी साहेबांना सोडणारच नव्हतो. एका वयानंतर दुसऱ्यांनाही संधी द्यायला हवी. आता मी सुद्धा वयाची ६० वर्षे पार केली आहेत. आम्ही आहोत ना. काही चुकलं तर आमचा कान धरा, असे अजित पवार पक्ष सोडण्याच्या मुद्द्यावर म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img