21 C
New York

Ajit Pawar : अजितदादा पुन्हा म्हणाले, कुठेतरी थांबलं पाहिजे…

Published:

राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar)लोकसभा निवडणुकीच्या मंचावरुन आता 2019 मध्ये घेतलेल्या शपथविधीचे बिंग फोडू लागले आहेत. शरद पवारांनी मला संधी दिली हे खरं आहे. पण त्यांनाही कोणीतरी संधी दिली होती. मात्र कुठेतरी थांबलं पाहिजे ना, असे म्हणत अजित पवारांनी, ‘मी साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती की नाही?’ असा भावनिक प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील केंदूर येथील प्रचार सभेत केला आहे.

बारामती लोकसभेची निवडणूक 7 मे रोजी झाली आहे. आता चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील शिरुर, पुणे, मावळ मतदारसंघाचा समावेश आहे. शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव यांच्या प्रचारार्थ केंदूर येथील प्रचार सभेला अजित पवार संबोधित करत होते.

व्हायरल ऑडिओ क्लीपवर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

Ajit Pawar मी योग्य निर्णय घेतला

यावेळी त्यांनी मी कामाचा माणूस आहे. भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना अजित पवार म्हणाले की, मी योग्य निर्णय घेतला आहे. आता माझं वय साठपेक्षा जास्त आहे. आम्हाला कधी संधी मिळणार? मला साहेबांनी (शरद पवार) संधी दिली हे खरं आहे. पण साहेबांना यशवंतराव चव्हाणांनी संधी दिली होती. प्रत्येकाला कोणी ना कोणी संधी दिलेली असतेच. शरद पवारांनी 11 वर्षांतच यशवंतराव चव्हाणांची साथ सोडली. असं अजित पवार म्हणाले. माझे आजी-आजोबा शेतकरी कामगार पक्षाचे होते. तरीही यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना आमदारकीचे तिकीट दिले. महाराष्ट्रातील एक जागा पडली तरी चालेल पण शरद पवारांना उमेदवारी द्यायची असे सांगून त्यांनी तिकीट दिले. मात्र 11 वर्षांनीच शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांची साथ सोडली. त्यांना किती दुःख झालं असेल, असे सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

Ajit Pawar भाजपसोबत जाण्याचे एका बैठकीत ठरले होते – अजित पवार

मी दिलेल्या शब्दाचा पक्का आहे असे सांगताना अजित पवार म्हणाले की, एकदा दिलेला शब्द मी बदलत नाही. एका उद्योगपतीच्या घरी दिल्लीत मिटींग झाली. अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिटींग झाली. सहा बैठका भाजप नेत्यांसोबत झाल्या. दिल्लीतून बैठकीवरुन आल्यानंतर शरद पवारांनी सांगितलं आपल्याला शिवसेनेसोबत जायचंय. मी म्हटलं आपण शब्द दिलाय. मी शब्द दिला आणि तो पाळला. 2019 मध्ये 72 तासांसाठी का होईना मी सरकार स्थापन केलं. ते सरकार चाललं नाही. आता मी साठ वर्षांपेक्षा जास्त आहे. तुम्ही जे आदेश दिले ते आम्ही जी हुजूर म्हणत शिरसावंद्य मानले.

मतदानाचा टक्का कमी, महायुतीचं टेन्शन वाढलं ?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img