3.2 C
New York

Devendra Fadnavis : पवारांनी दिलेले हे संकेत.. फडणवीसांचा गौप्यस्फोट

Published:

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा केला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, त्यांनी स्पष्टचं प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भविष्यात शरद पवार गटच काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. धुळे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरे यांच्या प्रचारसभेसाठी आज, देवेंद्र फडणवीस धुळ्यात होते, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis शरद पवारांनी दिलेले हे संकेत

फडणवीस म्हणाले की, त्यांना असं म्हणायचं असेल तर त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्या डोक्यात असेल की तो काँग्रेसमध्ये विलीन करावा. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी हे संकेत दिले आहेत. त्यांचा पक्ष त्यांना चालवणं शक्य होणार नाही. त्यामुळे ते या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील.

‘या’ वक्तव्यामुळे अजित पवारांचा कोल्हेंवर निशाणा

Devendra Fadnavis काय म्हणाले होते शरद पवार?

पुढच्या दोन वर्षांमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील. आपल्या पक्षाचं हित ओळखून काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारतील, असं भाकित शरद पवारांनी वर्तवलं. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर काँग्रेस आमच्यामध्ये फारसा फरक नाही. आमची विचारधारा सारखीच आहे.

Devendra Fadnavis आठही जागा जिंकू

उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला प्रतिसाद मिळत आहे. आमच्यासाठी वातावरण अनुकूल आहे. आम्ही आठही जागा चांगल्या फरकाने जिंकणार आहोत. नंदुरबारमध्ये हिना गावित रेकॉर्ड मताने जिंकतील. धुळ्याला देखील सुभाष भामरे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पवारांबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा…

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img