IPL 2024 स्पर्धेतील पंचांच्या (DL vs RR) निर्णयावरून सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. त्यात आता संजू सॅमसनच्या (Sanju Samson) विकेटची भर पडली आहे. संजू सॅमसन आऊट आहे की नॉट आउट, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. काही म्हणतात आऊट तर काही म्हणतात की पंचांचे खराब प्रदर्शन.. पण मॅचमध्ये संजू सॅमसनला वेगवेगळ्या अँगलमधून व्हिडिओ पाहून थर्ड अंपायरने बाद केले. मात्र त्यावर विश्वास न ठेवता संजू सॅमसनने मैदानावरील पंचांशी वाद घातला. आढावा घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्व काही जाहीर झाले होते. त्यामुळे संजू सॅमसनला निराश व्हावे लागले. आता संजू सॅमसन बाद होता की नाही यावर अनेक मतमतांतरे आहेत. आता पंचांचा निर्णय अंतिम असल्याचे जाहीर करण्यात आले, पण संजू सॅमसनचे चाहते काहीही मानायला तयार नाहीत. या कॅचचा व्हिडिओ शेअर करत ते आपले मत मांडत आहेत. काहींनी शाई होपचा पाय सीमारेषा असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे हा वाद लवकर शमेल असे वाटत नाही.
दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 20 षटकांत 222 धावांचे आव्हान ठेवले होते. संजू सॅमसन आणि शुभम दुबे फलंदाजी करत होते. संजू सॅमसन धावा आणि चेंडूंचे गणित मांडत पाठलाग करत होता. धावांचे अंतर वाढल्याने त्याने आक्रमक पवित्रा घेतला. 15.3 षटकात 162 धावा झाल्या होत्या. तसेच 27 चेंडूत 60 धावा हव्या होत्या. मुकेश कुमार गोलंदाजी करत होता. चौथ्या चेंडूवर संजूने जोरदार फटका मारल्याने चेंडू थेट शाई होपकडे गेला. मात्र सीमारेषेवरचा त्याचा झेल वादाचा ठरला. अखेर संजू सॅमसनचा डाव 86 धावांवर संपुष्टात आला. मात्र यानंतर संजू सॅमसन नाराज दिसला.