19.7 C
New York

Rutuja Bagwe: ऋतुजा बागवे झळकणार हिंदी मालिकाविश्वात!

Published:

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. मराठी कलाकार हिंदी मनोरंजन विश्व चांगलाचं गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता आणखी एक अभिनेत्री हिंदी मालिकाविश्वात झळकणार आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पडणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवेला (Rutuja Bagwe) ओळखलं जातं. ही मराठी अभिनेत्री आता हिंदी मालिकांमध्ये झळकणार आहे.


‘नांदा सौख्य भरे’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ यांसारख्या मालिकांमधून ती प्रसिद्धीस आली. ‘अनन्या’ या नाटकामुळे तिला विशेष ओळख मिळाली. मात्र ऋतुजा बऱ्याच काळाने मालिका विश्वात कमबॅक करणार आहे. पण, यावेळी ऋतुजा मराठी मालिका नाही तर हिंदी मालिकेत झळकणार आहे. ‘माटी से बंधी डोर’ या ‘स्टार प्लस’ वरील नव्या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारणार आहे. या नव्या कोऱ्या मालिकेत ती ‘वैजू’ हे पात्र साकारेल. याचा प्रोमो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ऋतुजासोबत हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीचा अभिनेता व ‘बिग बॉस’ फेम अंकित गुप्ता प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘रणविजय’ असं त्याच्या पात्राच नाव आहे.

किरण मानेंनी विचारला मराठी कलाकारांना जाब! पोस्ट शेअर करत म्हणाले…


याबाबत बोलताना ऋतुजा म्हणाली, “मी कित्येक दिवसापासून चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. नाटक-सिनेमे तर चालू आहेत परंतु मालिकेत काम करायला पाहिजे असं नेहमी वाटायचं. पडद्यावर सतत दिसणं ही कलाकारांची गरज झालेली आहे. त्यामुळे मालिका हे माध्यम कलाकाराला खूप काही देत असतं. बाहेरुन सोपं वाटत असलेलं मालिकाविश्व, ते आम्हा कलाकारांसाठी खूपच आव्हानात्मक असतं. सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, पण वेगळ्या भूमिका साकारायला मिळायल्या हव्यात. हे विचार सुरु असतानाच या मालिकेबद्दल विचारणा झाली.”


एका मुलाखतीत, दिग्दर्शक, कथा आणि भूमिका या सगळ्याचा विचार करून मी ही मालिका स्वीकारली असं ऋतुजा म्हणाली. गौरव मोरे, हेमांगी कवी, कुशल बद्रिके, अभिज्ञा भावे या कलाकारांपाठोपाठ आता आणखी एक मराठी कलाकार हिंदी मनोरंजन विश्वात पदार्पण करणार. त्यामुळे ऋतुजाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img