8.4 C
New York

Ranveer- Deepika: रणवीर-दीपिकामध्ये वादाची ठिणगी! रणवीरने लग्नाचे फोटो केले डिलीट…

Published:

(Ranveer- Deepika) बॉलीवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही कायमच चर्चेत असते. दीपिका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांना कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर आपल्या नव्या प्रोजेक्ट्सची माहिती देत असते. २०१८ मध्ये दीपिका पादुकोणने बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याच्यासोबत लग्नबंधनात अडकली.


सध्या दीपिकाच्या प्रेगनन्सीची जोरदार चर्चा सुरु आहे. दीपिका सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याची वार्ता आहे. रणवीर सिंहने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दीपिका प्रेग्नंट असल्याचे जाहिर केले. अशातच प्रेगनन्सीनंतर दीपिका पहिल्यांदा स्पाॅट झाली आहे. त्यात दीपिका बेबी बंपसह स्पाॅट झालीये. मात्र, रणवीर सिंगच्या वागण्यामुळे चर्चेला उधाण आलंय. रणवीर सिंहने त्याच्या इंस्टाग्रामवरून थेट दीपिका पादुकोण आणि त्याच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले. त्यामुळे विविध चर्चा या जोरदार रंगताना दिसत आहेत. अचानक रणवीर याने लग्नाचे फोटो डिलीट केल्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. रणवीर नेहमीच दीपिकासोबतचे खास क्षण शेअर करताना दिसतो. परंतु, त्याने हे पोस्ट का डिलीट केले असतील असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय.

रितेश-जिनिलियाने केले मतदान; रितेशच्या वक्तव्याची चर्चा!


रणवीर सिंहच्या इंस्टाग्रामवर आता एकून 133 पोस्ट शेअर केलेल्या आहेत. त्यातील फक्त लग्नाचेच फोटो त्याने डिलीट केले असल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे रणवीरने लग्नाचे सर्व व्हिडीओ देखील डिलीट केले आहेत. रणवीर सिंह याने शेअर केलेली शेवटची पोस्ट ही एका जाहिरातीची आहे. १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये रणवीर-दीपिकाचे लग्न पार पडले होते. या सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते. रणवीर सिंह आणि दीपिकाच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img