19.7 C
New York

Pankaja Munde : ऐन निवडणुकीत पंकजा मुंडेंची ‘ती’ ऑडिओ क्लीप व्हायरल

Published:

भाजप नेत्या आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारासोबतचा ऑडिओ कॉल व्हायरल झाला आहे. बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड (Ravikant Rathod) यांच्यासोबत बोलत असताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांना फॉर्म काढून घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. एवढेच नाही तर बंजारा समाजाची (Banjara Community) मतंही मलाच मिळणार आहेत. मात्र, त्यातले दहा पाच हजार मतं घेऊन फार काही होणार नाही, असेही यावेळी पंकजा मुंडे ऑडिओ क्लीपमध्ये म्हणताना ऐकायला येत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लीपबाबत (Audio Clip) अद्याप पंकजा मुंडे यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे विधान

बीड जिल्ह्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला असताना रविकांत राठोड यांनी त्यांना सहकार्य करण्यासंदर्भात बोलत असतानाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.ही उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात उमेदवाराला विनंती करत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांची संपूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन सुद्धा दिला आहे. विशेष म्हणजे महामंडळाच्या संदर्भातील तुमच्या त्या कामाला मी मदत करेल, असं म्हणून पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना मदत करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. रविकांत राठोड हे आधी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. मात्र, बीड लोकसभेसाठी त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात ते आता काम करत आहेत.

Pankaja Munde बीडमध्ये मोदींची सभा

बीड लोकसभा (Beed Lok Sabha) मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचे आव्हान आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी बीडमध्ये सभा घेतली होती. यानंतर आज बीडमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे. बीड लोकसभेसाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा चांगलाच प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर बीड लोकसभेची गणित बदलणार का, हे आता पाहावे लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img