23.1 C
New York

Kiran Mane: किरण मानेंनी विचारला मराठी कलाकारांना जाब! पोस्ट शेअर करत म्हणाले…

Published:

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काही दिवसांपूर्वी मुंबईत लोकसभा निवडणूक प्रचारात एका जाहिरातीचं उदाहरण दिलं होतं. या जाहिरातीत भाजपाने अॅडल्ट स्टारचा वापर केला जात असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत अभिनेता किरण मानेंनी (Kiran Mane) एक पोस्ट लिहिली आहे. किरण मानेंनी हंबरडे फोडणारी बांडगुळं म्हणत कलाकारांना प्रश्न विचारला आहे.


नेमकं काय लिहिलं आहे मानेंच्या पोस्टमध्ये?
खरंतर आत्ता सगळ्या कलाकारांनी प्यारल राज नयानीच्या बाजूनं उभं रहायची गरज आहे. पण तो ‘ठराविक’ टोळक्यातला नाही. आपल्या डबक्यातल्या एखाद्याला साधं ट्रोलींग झालं की गळे काढून हंबरडे फोडणार्‍या पोस्ट करणारी बांडगुळं, नेमकं जेव्हा आवाज उठवायची गरज असते तेव्हा थोबाड उचकटत नाहीत !


एक कलाकार विविध भूमिका करतो कारण हा त्याचा व्यवसाय आहे. प्याराली राज नयानी यानं ओरीजीनल शिवसेनेच्या एका जाहिरातीत काम केलं. ‘वॉर रूकवा दी पापा’ची भन्नाट खिल्ली उडवणारी ती जाहिरात होती आणि ती जाहिरात प्रचंड व्हायरल झाली. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पोटशूळ उठलेल्या सत्ताधार्‍यांनी थेट या कलाकाराचं चारीत्र्यहनन केलं! असा धक्कादायक आरोप किरण मानेंनी केला. त्यानं एका वेबसिरीजमध्ये केलेल्या एका सिनचा फोटो प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवून “हा पॉर्न फिल्ममध्ये काम करणारा नट आहे.” असा आरोप केला. जो आरोप धादांत खोटा आहे, असं किरण माने म्हणाले.

येत्या काही काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार

किरण माने संतप्त होऊन म्हणाले, बेधडक असे खोटे आरोप करताना यांना लाजा कशा वाटत नाहीत, ते ‘राम’ जाणे ! अशावेळी या कलाकारांवर, बायको-मुलांवर, वयोवृद्ध आईवडिलांवर, त्यांच्या कुटुंबावर काय आघात होतात याचा थोडासुद्धा विचार केला जात नाही?? एवढी माणुसकी मेली आहे???, असा जाब विचारत किरण मानेंनी पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत त्यांनी इतर मराठी कलाकारांना प्रश्न विचारला आहे.

…अशा गंभीर प्रसंगाच्या वेळी मराठी कला क्षेत्रातून आपल्या कलावंत बांधवाला सपोर्ट करणारा एकही आवाज उठत नाही, याचे मला नवल वाटत नाही. कारण मला माहिती आहे, काही अपवाद वगळता मराठी इंडस्ट्री एकजात भेकडांनी आणि लाळघोट्यांनी भरलेली आहे. फक्त आपल्या वाघानं फाडल्यागत बोंबाबोंब करण्यात किंवा कंपूतल्या कुणाला मुंगी चावली तर हे माहिर आहेत. अर्थात यातही काही अपवादात्मक निर्भिड कलावंत आहेत त्यांच्याविषयी आदर आहेच. असे घणाघात आरोप करत किरण माने यांनी मराठी सिनेसृष्टी समोर प्रश्न चिन्ह उभे केले आहे. या पोस्टवर कंमेंट्सचा पाऊस पडत आहे. मात्र, भाजपकडून काही प्रतिक्रिया येणार का असा सवाल विचारण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img