23.1 C
New York

Kartik Aryan: मुंबईचं ट्रॅफिक टाळण्यासाठी अभिनेत्यानी केला मेट्रोने प्रवास!

Published:

बॉलीवूडचा अभिनता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) नेहमीच चर्चेत असतो. मात्र या वेळी तो वेगळ्याच कारणांमुळे व्हायरल होत आहे. मुंबईचं ट्रॅफिक टाळण्यासाठी कार्तिक मेट्रोने प्रवास करतोय. सध्या कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्तिक आर्यनही आपली आलिशान कार सोडून मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करताना दिसला आहे. त्याने मास्क लावल्यामुळे मेट्रो मधली प्रवाश्यांनी त्याला लवकर ओळखले नाही. परंतु, थोड्या वेळानंतर आपल्यासोबत प्रवास करताना पाहून चाहत्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही. एका पाठोपाठ एक अशा प्रत्येकाने कार्तिकला सेल्फी काढण्याची विनंती केली. कार्तिकनेही कोणालाच नाराज न करता मास्क काढून त्यांच्यासोबत फोटो काढले.


कार्तिक आर्यन सध्या त्याचा आगामी ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे शूटिंगनिमित्त त्याला रोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. अशातच मुंबई सारख्या ठिकाणी प्रवास करणे म्हणजे रोज ट्रॅफिक सारख्या महादूताला सामोरे जाण्यासारखे आहे. त्यामुळे आजकाल अनेक कलाकार मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळून मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला प्राधान्य देताना दिसतात.

रणवीर-दीपिकामध्ये वादाची ठिणगी! रणवीरने लग्नाचे फोटो केले डिलीट…


या व्हायरल व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन आपल्यासोबत प्रवास करतोय हे कळताच मेट्रोच्या डब्यात खळबळ उडाली होती. कार्तिकने मास्क घातला होता परंतु त्याला चाहत्यांनी ओळखले. चाहत्यांनी कार्तिकसोबत बरेच फोटो क्लिक केले. कार्तिकचे चाहत्यांशी मनमोकळे वागणे पाहून चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत.


कार्तिकचा आगामी चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ मध्ये झळकणार आहे. चाहते या चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत. कार्तिकने ४ मे रोजी डबिंग स्टुडिओच्या ट्रेलरची झलक शेअर केली होती. कबीर खान दिग्दर्शित हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img