19.7 C
New York

Gaurav More : ‘या’ कार्यक्रमातून निरोप घेताना गौरव मोरे झाला भावुक

Published:

छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणारा कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अभिनेता गौरव मोरेने (Gaurav More) एक्झिट घेतली आहे. मागील काही दिवसांपासून गौरव मोरे या शोमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून देखील ओळखले जाते. अशावेळी त्यांची बरीच चर्चा रंगलेली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये गौरव मोरेने आपल्या अभिनयाने आणि कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. फिल्टर पाड्याचा बच्चन असणाऱ्या गौरव मोरेने आपल्या धमाल परफॉर्मेन्सने शोमध्ये धुमाकूळ घातला होता.

Gaurav More गौरव मोरेची पोस्ट काय?

गौरव मोरेने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याने म्हटले की, “नमस्कार, पवई फिल्टरपाड्यातून मी गौरव मोरे. तानानानाना. आरा बाप मारतो का काय मी…ये बच्ची… रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं. सन्मान दिला. त्याबद्दल मी व माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधुन आपला निरोप घेत आहे.

Gaurav More गौरव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला

फिल्टरपाड्याचा बच्चन’ ओळख मिळवणाऱ्या गौरव मोरेने चाहत्यांच्या मनात त्याची वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून गौरव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला.सध्या तो ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमातून चाहत्यांनी खळखळून हसवत आहे. पण सध्या सोशल मीडियावर गौरवचा एक किस्सा व्हायरल होत आहे. यामध्ये गौरव भावूक झालेला पाहायला मिळत आहे.यावेळी त्यांने त्याने जेव्हा पहिल्यांदा गाडी खरेदी केली तेव्हाचा किस्सा सांगितला आहे. यावेळी त्यांनी सांगितले बाहेर जायचं म्हटलं की मला वाटायचं की आपल्याकडे गाडी असायला हवी. बाबा नेहमी म्हणायचे की आपलल्याही घरात एक गाडी असावी. बाब म्हणाल्यावर मला वाटलं की सेकंड हॅंड का असेना मी गाडी घ्यायला हवी.

Gaurav More मुलाचं आणि वडिलांचे नातं खूप वेगळं असते

शेवट कसेबसे पैसे गोळा करून तो गाडी घ्यायला गेला तेव्हा समोरचा माणूस दीड लाखात चा हट्ट धरून बसला त्यावेळी गौरवकडे १ लाख १० हजार होते. तेव्हा ती गोष्ट शक्य झाली नाही. शेवटी 2015 मध्ये गौरवने गाडी घेतली पण तेव्हा बाबा नव्हते. आज गाडीमध्ये बसताना त्यांची आठवण येते. मुलाचं आणि वडिलांचे नातं खूप वेगळं असते. हे नातं वेगळं करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.प्रत्येकजण स्वप्न पाहतो; त्यातील काही पूर्ण होतात, तर काही परिस्थितीमुळे पूर्ण होत नाहीत.एखाद्या मुलाची कल्पना करा जो त्याच्या मनाची इच्छा पूर्ण करू शकत नाही, मग तो ठरवतो की आता त्याचा मुलगा त्याची अपूर्ण इच्छा पूर्ण करेल.आपल्या मुलाचे वडील होण्याचे स्वप्न पाहण्यात आणि आपल्या मुलांद्वारे आपली स्वप्ने जगण्यात काहीही गैर नाही.

पण काही वडील जबरदस्तीने आपल्या इच्छा मुलांवर लादतात. अशा वृत्तीमुळे मुलाच्या मनात कटुता निर्माण होते.तो या अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु तरीही तो त्याच्या वडिलांना आनंदी करू शकला नाही. यामुळे तो स्वतःचा आणि वडिलांचा तिरस्कार करू लागतो.आपण हे समजून घेतले पाहिजे की मुलगे आपल्या वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी असतात हे आवश्यक नाही. कोणी स्वतःच्या इच्छेने हे करत असेल तर ठीक आहे. पण तुमच्यासाठी आधीच ठरलेली रेषा, दगडावर काढलेली, तुमच्यासाठी आनंददायी असावी असे नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img