22.3 C
New York

ECI : मुंबई, नाशिक पदवीधर, शिक्षकची निवडणूक जाहीर

Published:


केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) विधान परिषदेच्या (Legislative council) मुंबई, कोकण, नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. एकूण ४ जागांसाठी ही १० जून रोजी होणार आहे. तर १३ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

विधान परिषदेच्या चार सदस्यांची 7 जून रोजी मुदत संपत आहे. यात मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकणचे निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे तसेच मुंबई शिक्षक आमदार कपिल हरिशचंद्र पाटील यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच ही निवडणूक हॉट आहे. पण, मतदान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना १५ मे रोजी जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ मेपर्यन्त आहे. २७ मे पर्यन्त उमेदवार माघार घेऊ शकतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img