23.1 C
New York

Sanju Samson : संजूला वाद अंगलट… होणार कारवाई

Published:

दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यानं वादळी 86 धावांची खेळी केली. संजू सॅमसन याची विकेट पडल्यानंतरच दिल्लीने सामन्यात कमबॅक केले. संजू सॅमसनची विकेट सध्या चर्चेत आहे. संजू सॅमसन खरेच बाद होता का? संजू सॅमसन याला बाद दिलेल्या पंचाच्या निर्णायावरुन सध्या जोरदार गोंधळ सुरु आहे. तिसऱ्या पंचाच्या निर्णायावरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. पंचांनी बाद दिलेल्यानंतर भरमैदानात आणि मैदानाबाहेरही गोंधळ पाहायला मिळाला. त्यावर आता BCCI ने संजू वर मोठी कारवाई केली आहे. आता संजूला मोठा दंड ठोठावण्यात आला असुन संजूला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. संजूच्या दंडाबाबत आयपीएलने अधिकृतपणे स्पष्टीकरण दिले.

Sanju Samson काय घडलं नेमकं ?

संजू सॅमसन सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या 5 षटकांत रॉयल्सला विजयासाठी 63 धावांची गरज होती. सामन्याच्या या नाजूक वळणावर पंचांनी एक नव्हे तर दोन मोठ्या चुका केल्या. जेव्हा सामना शेवटच्या आणि चुरशीच्या टप्प्यात येतो तेव्हा अंपायरिंगही तितक्याच काळजीने करायला हवी. हिल्या 3 चेंडूत केवळ 3 धावा दिल्यानंतर मुकेशने चौथा चेंडू स्टंपच्या आऊट साइडला स्लोअर टाकला. सॅमसनने हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारला, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार जाणार इतक्यात, अचानक शाई होप धावत आला आणि झेल घेतला. हा झेल चांगलाच वादग्रस्त ठरला. संजूला थर्ड अंपायरने बाद दिले. अनेक वेळा रिप्ले पाहिल्यानंतरही तिसऱ्या पंचांनी वाइड दिला नाही.या डॉट बॉलनंतर राजस्थानला शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती. पॉवेल दबावात बाद झाला आणि राजस्थान विजयापासून 20 धावा दूर राहिला.

संजू सॅमसनच्या विकेटने मोठा वाद.. काय घडलं नेमकं ?

Sanju Samson संजू सॅमसन याचं शतक थोडक्यात हुकलं

सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहचला होता. संजू सॅमसनचा जम बसला होता. संजू सॅमसन याचं शतक थोडक्यात हुकलं. संजू 86 धावांवर बाद झाला. त्याचा सिमारेषावर शाय होप यानं झेल घेतला. यावरुनच वाद झाला. याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. संजू सॅमसन यानं राजस्थानकडून एकाकी झुंज दिली. संजू सॅमसन यानं मैदानावरील पंचासोबत चर्चा केली. यावेळी मैदानावर गोंधळ झाला होता. संजू सॅमसन याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 8 बाद 221 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकांत केवळ 201/8 धावा करता आल्या. अशाप्रकारे राजस्थानला २० धावांनी सामना गमवावा लागला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img