3.2 C
New York

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग, गुन्हा दाखल

Published:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी 30 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम कुमार नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांचा ताफा ठाण्याहून मुंबईकडे निघाला असताना ही घटना घडली. पोलिसांच्या वारंवार इशारा देऊनही तो तरुण थांबला नाही, त्याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग सुरूच ठेवला आणि अखेर पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मी अभिनेता असल्याचे सांगितले. वांद्रे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

चौकशीत त्याने आपण अभिनेता…

रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांचा ताफा ठाण्यातून मुंबईकडे येत असताना ही घटना घडली. सी लिंकवर पोलीस वाहतुकीचे नियमन करत होते. सी लिंकवरील 7 आणि 8 मार्ग मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रिकामे करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना वाहतूक पोलिसांनी तरुणाला गाडी सहाव्या लेनमध्ये ठेवण्यास सांगितले. मात्र तरुणाने गाडी सातव्या लेनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात नेली. त्यानंतरही हा तरुण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे गाडी चालवत होता. वरळी सी लिंकवर थांबण्याचा इशारा देऊनही तरुण थांबला नाही. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवले, चौकशीत त्याने आपण अभिनेता असल्याचे सांगितले. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 दक्षिण मुंबई विजयासाठी यामिनी जाधवांची ‘मनसे’ साद

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img