21 C
New York

Lok Sabha Election : ऊर्जा मंत्र्यांच्या सभेत बत्तीगुल

Published:

राज्यात लोकसभा निवडणुकांचा ज्वर भरला आहे. (Lok Sabha Election) रणरणत्या उन्हात प्रचाराचा जोर वाढला आहे. स्टार प्रचारकांच्या भरउन्हात सभा होत आहेत. या सभांना लोकांचाही प्रतिसाद मिळत आहे. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात (Devendra Fadnavis) ठिकठिकाणी सभा घेत आहेत. फडणवीसांकडे ऊर्जा खातंही आहे. आता असाच एक किस्सा या ऊर्जामंत्र्यांच्या बाबतीत घडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेत आज अजब प्रकार बघायला मिळाला आहे.

Lok Sabha Election फडणवीस यांचं भाषण सुरु असतानाच अचानक बत्तीगुल

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असतानाच अचानक बत्तीगुल झाली. अचानक लाईट गेल्यामुळे मंचावर पूर्णत: अंधार पसरला. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना लाईट गेल्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलमधील टॉर्च लावले आणि मंचाच्या दिशेला दाखवले. “तुमचे लाईट सुरु झाले. अरे आपला करंटच असा आहे की या लाईटची आवश्यकता नाहीय. डब्ब्यामध्ये आपण बसलो तर हा डबा मोदींच्या डब्याला लागणार आहे. असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर,धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

Lok Sabha Election फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही

संबंधित प्रकार हा भुसावळ येथे झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत्याचं असं झालं, रावेर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही. ते म्हणाले, काही काळजी करू नका. लाईट बंद झाले असले तरीही तुम्ही मोबाईलचे लाईट सुरू केले आहेत. आपला करंटच असा आहे की लाईटची गरज नाही. ‘हमको रोक सके ये किसी अंधरे में दम नहीं, रोशनी हम से है रोशनी से हम नहीं’, असा खास शेरही त्यांनी या निमित्ताने सुनावला.

Lok Sabha Election साठ कोटी लोकांच्या घरात नळानं पाणी दिलं

यानंतर फडणवीसांनी मागील दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. इंडिया आघाडीचे सगळेच नेते म्हणतात आम्ही इंजिन आहोत. त्यासाठी आता तुम्ही रक्षा खडसे यांनी निवडून द्या. त्यांना निवडून दिलं म्हणजे तो डबा मोदींच्या विकासरुपी इंजिनला जोडला जाईल.दहा वर्षांत मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. त्याची आज जगभरात चर्चा होत आहे. वीस कोटी लोकांना पक्की घरे दिली. 50 कोटी लोकांच्या घरी गॅस पोहोचवला. साठ कोटी लोकांच्या घरात नळानं पाणी दिलं. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. त्यातील सात कोटी महाराष्ट्रातील आहेत.

अजितदादांनी शरद पवारांना थेट विचारलं…

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img