8.4 C
New York

Alia Bhatt: १६३ लोक आणि १९६५ तास; मेट गाला २०२४ मधला आलियाचा लुक खास!

Published:

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आपल्या दमदार अभिनयाची नेहमीच भुरळ पडत असते. मात्र, अभिनयासोबत आलिया आपल्या सौन्दर्याची छाप पडते. तिच्या फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकताच पार पडलेल्या ‘मेट गाला २०२४’ (Met Gala 2024) मधल्या आलियाच्या लूकची आणि तिने नेसलेल्या साडीची चर्चा सुरु आहे. या सोहळ्याला अनेक हॉलिवूड आणि जगभरातील कलाकार उपस्थित होते.


अशातच आलियाच्या लूकने छाप पडली आहे. या फॅशन वीकमध्ये आलियाने मेट गालाच्या रेड कार्पेटवर वॉक केला. अभिनेत्रीने स्टायलिस्ट अंदाजात साडी नेसली होती. सध्या सोशल मीडियावर आलियाच्या हा लुक व्हायरल होत आहे. आलियाच्या सौन्दर्यासमोर मस्तानी आणि अप्सरा फेल पडतील, अशी कंमेंट एका चाहत्याने केली आहे.

रणवीर-दीपिकामध्ये वादाची ठिणगी! रणवीरने लग्नाचे फोटो केले डिलीट…

शेअर केलेल्या पोस्टबाबत आलियाने सांगितलं, एकूण १६३ लोकांनी ही साडी बनवली आहे. साडी तयार करण्यासाठी जवळपास १९६५ तास लागले आहेत. ‘सब्यसाची’ या प्रसिद्ध ब्रँडनी ही साडी डिझाई केली आहे. साडीवरील डिझाईन्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मेट गालाच्या रेड कार्पेटसाठी आलियाने सब्यसाचीने डिझाईन केलेली पेस्टल कलरची साडी नेसली आहे.


आलियाने स्मोकी मेकअप करून आणि स्टायलिश दागिने परिधान करून हा लुक परिपूर्ण केला. साडीसोबत तिने डीप नेक ब्लॉऊज आणि शॉर्ट स्लीव्ह आहेत. आलियाच्या आई आणि सासूने तिचे फार कौतुक केले आहे. त्याचसोबत चाहत्यांकडून आलियाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अनेक सिलिब्रिटीं देखील आलियाचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img