शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील
(Akshay Adhalrao) यांच्यात सामना आहे. प्रचारात आरोप प्रत्यारोपांचा अँगल थोडा बदलला आहे. अमोल कोल्हे यांनी थेट आढळराव पाटील यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या कारभारावर प्रश्न विचारले. त्यामुळे मतदारसंघातील राजकारणाचा पारा चढला. कोल्हेंनी विचारलेले प्रश्न आणि आरोपांना स्वतः अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. तसेच कंपनीविरोधात पुरावे असतील तर समोर आणा सगळी उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत, असे आव्हान त्यांनी अमोल कोल्हेंना दिले.
Akshay Adhalrao आरोग्यासंदर्भात आढळरावांचे सर्वाधिक प्रश्न
अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आढळरावांनी संसदेत सर्वाधिक प्रश्न संरक्षण खात्याशी संबंधित विचारले असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला. खरंतर आढळरावांनी त्यांच्या दोन टर्मच्या काळात लोकसभेत एकूण २१८५ प्रश्न विचारले. यामध्ये डिफेन्ससंदर्भातील ६७ प्रश्नांचा समावेश आहे. सर्वाधिक १८२ प्रश्न आरोग्य आणि कुटुंब कल्याणासंदर्भात होते. मनुष्यबळासंदर्भात १५१ प्रश्न, रेल्वेसंदर्भात १४५ प्रश्न, शेतीसंदर्भात १४३ प्रश्न दहा वर्षांच्या काळात विचारले.
पवार काँग्रेस विचारांचेच, पृथ्वीराज चव्हाणांचे विधान
भारतातील संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची मालकी भारत सरकारकडे आहे. २०२३-२४ मध्ये भारताने विविध देशांना २२ हजार कोटींचे डिफेन्स एक्सपोर्ट केले आहे. त्याआधीच्या वर्षात हा १६ हजार कोटींचा होता. म्हणजेच एकाच वर्षात ३२ टक्के वाढ या क्षेत्रात झाली आहे. डिफेन्स क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात आणि त्यातही आपल्या मतदारसंघात आहेत. या कंपन्यांत काम करणारे कर्मचारी देखील आपल्याच मतदारसंघातील आहेत. आपल्याला इतकं तरी ज्ञान असलं पाहिजे की ज्यावेळी या गोष्टींवर प्रश्न विचारले जातील. या कंपन्यांना चालना देण्यासाठी प्रश्न विचारले जात असतील तर त्याचा फायदा आपल्या मतदारसंघातील लोकांनाच होणार आहे.
Akshay Adhalrao कोल्हे साहेब, तुमची कीव करावीशी वाटते
हा प्रश्न विचारल्याने डायनालॉग या कंपनीला भरपूर फायदा झाला आहे असं जर आपल्याला (अमोल कोल्हे) वाटत असेल. संसदेत एखादा प्रश्न विचारल्याने डिफेन्स प्रॉक्युअरमेंट होऊ शकते असेही वाटत असेल तर आपली कीवच केली पाहिजे असं मला वाटतं.