बारामतीमधील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी महायुतीचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao Patil ) यांच्या शिरूर मतदार संघाकडे मोर्चा वळवला आहे. त्यामध्ये त्यांनी घोडेगाव येथील सभेत अमोल कोल्हेंवर ( Amol Kolhe ) नथुराम गोडसे यांची भूमिका केल्याने जोरदार निशाणा साधला.
Ajit Pawar पैशांसाठी गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका…
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, अमोल कोल्हे यांना मीच टिकिट दिले होते. मी त्यांना शोधून आणलं होतं. माझ्या घरी दुपारी जेवायला बोलवलं होतं. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांचे देखील सारखे फोन येत होते. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंचा फोन न घेण्यास सांगितलं. त्यांचा फोन माझ्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेश जाहीर केला. त्यावेळी कोल्हे म्हणाले होते की मी निवडणुकीला उभा राहील. पण तुम्ही सगळं बघायचं. मी फक्त भाषण करणार. मी देखील त्यांना नियमानुसार खर्च आणि निवडणुकीत जिंकण्यासाठी जीवाचे रान करू असं सांगितलं. त्यांना निवडूनही आणलं पण दोनच वर्षांनी ते म्हणाले मी सेलिब्रिटी आहे.
Ajit Pawar पैशांसाठी गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका…
मला मालिका चित्रपट यांच्या शूटिंग असतं. छत्रपती संभाजी महाराजांचे भूमिका करतो. मी म्हटलं त्यामुळेच तुम्ही निवडून आलात. पण दोन वर्षांनी ते राजीनामा देण्याची भाषा करू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक चित्रपट फ्लॉप झाल्याने चित्रपट निर्मितीचे पैसे देखील न मिळाल्याचे कारण सांगितलं. मात्र चित्रपट फ्लॉप अभिनेत्यांना त्यांचं ठरलेलं मानधन मिळतच असेही अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच अमोल कोल्हे यांनी पैशासाठी महात्मा गांधी यांच्या हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांची देखील भूमिका केली. त्यामुळे त्यांच्या भूमिकांमध्ये एकदम विरोधाभास आहे. एकीकडे छत्रपती संभाजी महाराज दुसरीकडे थेट नथुराम गोडसे. असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.
मंगळवारी देशासह राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये राज्यातील चर्चेतील मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघाचा मतदान देखील पार पडलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचे उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार कार्य झाल्याने अजित पवार यांनी आता शिरूर मतदारसंघातील महायुतीचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी सभांचा धडाका लावला आहे. यामध्ये त्यांनी आढळरावांसाठी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाहीर सभा घेतली. त्यानंतर आज दिवसभरात या मतदारसंघात त्यांच्या एका मागे एक सभा होणार आहेत.