7.6 C
New York

Ajit Pawar : पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांचा दाखला

Published:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, त्याबद्दल मला माहित नाही. पण त्यांनी 1986 ला देखील त्यांनी समाजावादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेस आयमध्ये विलीन केला होता. त्याचा मी देखील साक्षीदार होतो. असं म्हणत एक प्रकारे अजित पवार यांनी शरद पवार हे त्यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे.

Ajit Pawar सभांचा धडाका लावला

सध्या अजित पवार यांनी बारामतील प्रचार थांबल्याने आता शिरूर मतदारसंघातील महायुतीचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी सभांचा धडाका लावला आहे. यामध्ये त्यांनी आढळरावांसाठी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शरद पवार यांच्या काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला असता. एक प्रकारे अजित पवार यांनी शरद पवार हे त्यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे.

पवारांनी दिलेले हे संकेत.. फडणवीसांचा गौप्यस्फोट

अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं म्हटलं त्याबद्दल मला माहिती नाही. मात्र 8 डिसेंबर 1986 रोजी देखील त्यांनी अशाच प्रकारे आताच्या छत्रपती संभाजी नगरमध्ये सभा घेत समाजावादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेस आयमध्ये विलीन केला होता. त्याचा मी देखील साक्षीदार होतो. असं म्हणत एक प्रकारे अजित पवार यांनी शरद पवार हे त्यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे.

Ajit Pawar काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत राहून चांगल्या समन्वयाने काम करतील. यातील काही प्रादेशिक पक्ष त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लागू होत नाही का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, मला राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात कोणताच फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारसरणी मानणारे आहोत. आता आमच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का याबाबत माझ्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेस पक्षाच्या अधिक जवळ आहोत. असे असले तरी आगामी काळातील रणनिती पक्षातील सहकारी यांच्याबरोबर चर्चा करून एकत्रितपणे ठरण्यात येईल.

‘या’ वक्तव्यामुळे अजित पवारांचा कोल्हेंवर निशाणा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img