3.8 C
New York

Air India : एअर इंडिया एक्स्प्रेसची 80 हून अधिक उड्डाणे रद्द, काय आहे कारण ?

Published:

एअर इंडिया (Air India) एक्स्प्रेससमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचं विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे आपली नोकरी धोक्यात असं असं दोन्ही एअरलाईन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या भावना आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी विरोध करत असून सामूहिक रजेवर गेले आहेत. परिणामी 78 आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या 78 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइनचे वरिष्ठ क्रू मेंबर्स मोठ्या प्रमाणावर आजारी असल्याचं सांगत रजेवर गेले आहेत.

Air India एअर इंडिया एक्सप्रेसकडून निवेदन जारी

एअर इंडिया एक्सप्रेसनं एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, “आमच्या वरिष्ठ केबिन क्रूच्या एका वर्गानं काल रात्री अचानक आजारी असल्याचं सांगत रजा घेतली आहे. परिणामी फ्लाईटला विलंब झाला आणि काही फ्लाईट्स रद्द झाल्यात.

ऊर्जा मंत्र्यांच्या सभेत बत्तीगुल

दरम्यान जे कर्मचारी अचानक सुट्टीवर गेले आहेत, त्यांच्या बरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न एअर इंडियाचे व्यवस्थापन करत आहेत. हे कर्मचारी एअर इंडियात नव्यानं ज्या अटीशर्ती लागू केल्या आहेत त्याला त्यांचा विरोध आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.’ आमचे केबिन क्रू अनेक सदस्य अचानक अजारी पडले आहेत. त्यामुळे आमच्या अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही उशिराने उड्डाण करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करत आहोत. त्यामुळे प्रवाशांना असुविधा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Air India तिकीटाचे रिफंड पूर्ण देणार

टाटा ग्रुपची एअरलाईन्स एअर इंडियामध्ये संकट निर्माण झाले आहे. अनेक जणांना एकाच वेळी सुटी घेतल्यामुळे विमानांचे उड्डान रद्द करावी लागले. यासंदर्भात बोलताना एअर इंडियाचे प्रवक्ताने सांगितले की, आमच्या अनेक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सुटी घेतली आहे. त्यानंतर विमानांचे उड्डानांमध्ये उशीर होत आहे. काही विमाने रद्द करावी लागली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आमच्या क्रू मेंबर्ससोबत चर्चा करत आहोत. विमानांचे उड्डान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्यांची तिकीटाचे पूर्ण रिफंड मिळणार आहे. तसेच कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आपला प्रवास रिशेड्यूल्ड करता येईल. तसेच बुधवारी विमानतळावर जाण्यापूर्वी एअरलाईन्सला संपर्क करुन फ्लाइटसंदर्भात माहिती घ्यावी, असे आवाहन विमान कंपनीने केले आहे.

छत्रपती संभाजीनगर,धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img