आजच्या डिजिटल युगात नातेसंबंध बदले आहेत. सध्याच्या जगात रिलेशनची व्याख्या बदली आहे. ऑनलाईन डेटिंगमुले माणसातील संबंध अधिक दृढ होत चाले आहेत. परंतु आजच्या जगात दोन प्रियकारांमध्ये मायक्रो-चीटिंगही (Micro- Cheating) व्याख्या समोर आली आहे. ज्या Micro Cheating in Relation असे म्हणतात. मायक्रो-चीटिंग म्हणजे प्रियकरासोबत असताना देखील गुप्तपणे दुसऱ्यांशी बोलणे किंवा शारीरिक संबंध ठेवणे. त्यामुळे जोडीदारासोबत असलेल्या नातेसंबंधातील विश्वास नष्ट होऊ शकतो.
मायक्रो-चीटिंगमुळे आपल्या जोडीदाराच्या भावनांना हानी पोहोचू शकते. तुमच्या जोडीदारामध्ये मायक्रो-चीटिंगची चिन्हे दुर्लक्षित करू नयेत. मायक्रो-चीटिंगमध्ये फक्त लैंगिक संबंध किंवा कोणाशीतरी जवळीक साधने आवश्यक नाही. रिलेशनमधली अगदी लहान गोष्ट सुद्धा गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. जस छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून नातं तयार होतं, त्यामुळे ते नातं तुटूही शकतं. गुप्तपणे किंवा जोडीदारासोबत लपवून जर तुम्ही दुसऱ्या कोणाशी गुप्त कनेक्शन किंवा संप्रेषणात गुंतत असाल तर हे सूक्ष्म फसवणूकीचे लक्षण आहे. जर तुमचा जोडीदार चॅट्सवर होणार बोलणं किंवा फोन, पासवर्ड लपवत असेल तर ते तुमच्या नातेसंबंधाला हानी पोहोचवू शकते आणि हे मायक्रो-चीटिंगचे लक्षण मानले जाते.
रात्री शांत झोप लागण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा!
फ्लर्टिंग हे देखील एक चिन्ह आहे. यात ऑनलाइन किंवा वैयक्तिकरित्या भेटणे, खोटे आश्वासन करणे, हे मायक्रो-चीटिंगचे लक्षण आहे. खोटं बोलणे हे अजून एक महत्वाचे लक्षण आहे. सातत्याने आपल्या जोडीदारासोबत खोटं बोलणे आणखी एक लक्षण आहे. त्यामुळे दुरावा वाढू शकतो आणि गैरसमज देखील उद्भवू शकतात. आपल्या जोडीदाराची तुलना दुसऱ्यांसोबत करणे. असुरक्षित वाटणे किंवा जोडीदार असताना देखील जीवनात इतर कोणाचा विचार करणे हे तुमच्या नातेसंबंधात धोक्याचे ठरू शकते.