7.8 C
New York

Voting Boycott : बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

Published:

पेण

आज लोकसभेच्या (Loksabha Election) तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 11 मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. एकिकडे मतदानासाठी उत्साह असताना दुसरीकडे बाळगंगा प्रकल्पग्रस्त (Balganga Dam Project) गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार (Voting Boycott) टाकल्याचे दिसून येत आहे. यामुळे या ठिकाणी आता मतदानावर निरुत्साह दिसून येत आहे. शासकीय अधिकारी यांनाही गावकऱ्यांची समजूत काढण्यात अपयश आले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण तालुक्याचे बाळगंगा प्रकल्पग्रस्त लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर कायम आहेत. आज प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी वरसई येथील मंदिरात बैठक घेवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परतु तो असफल ठरला. 13 वर्षापूर्वी सुरू झालेले हे धरणाचे काम 80 टक्के पूर्ण झालंय. परंतु प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे.

या धरण प्रकल्पांमध्ये अनेक जण विस्तापित झाले आहेत. अनेकांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्त ६ गावांमध्ये जवळपास ८ हजार मतदार आहेत. संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला याबत इशारा दिला होता. परंतु मागण्या पूर्ण न झाल्याने ते आपल्या भूमिकेवर कायम आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात आज ७ तारखेला मतदान होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img