23.1 C
New York

Rohit Pawar : ..तर अजितदादांवर कारवाई झाली पाहिजे- रोहित पवार

Published:

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान होत आहे. यातील बारामती मतदारसंघाची राज्यभरात चर्चा आहे. आज मतदानाच्या दिवशीच येथे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या ज्यामुळे मतदारसंघातील राजकारण ढवळून निघालं. आताही आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गट दमदाटी करत असल्याच्या अडीचशे तक्रारी आल्या आहेत. यातील 18 तक्रारी पैसे वाटपाच्या आहेत. बारामती मतदारसंघात 155 बूथ संवेदनशील आहेत, त्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Rohit Pawar वेल्ह्यात बोगस मतदानाचा प्रयत्न

आज सकाळपासून आमचे कार्यकर्ते बूथच्या संपर्कात आहेत. बारामती लोकसभा मतदार 155 संवेदनशील बूथ आहेत. 250 छोट्या मोठ्या तक्रारी मिळाल्या आहेत. यामध्ये 18 तक्रारी या पैसेवाटपाच्या आहेत. 8 तक्रारी मारहाण आणि शिवीगाळीच्या आहेत. तर 38 तक्रारी ईव्हीएमबाबत आहेत. तसेच बोगस मतदान करण्याचा प्रयत्न वेल्हा येथे झाला असा आरोप रोहित पवार यांनी केला.

राजन विचारेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Rohit Pawar अजित पवार गटाकडून मतदारांना पैशांचं वाटप

पीडीसीसी बँक रात्री एक वाजेपर्यंत का सुरू होती. मार्च एन्ड असता तर समजू शकलो असतो. पण तशी परिस्थिती नाही. म्हणजेच येथून पाचशे रुपयांच्या नोटा वाटल्या जात होत्या असं आमचं ठाम मत आहे. निवडणुकीत पैशांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि तो काल परवापासून सुरू झाला आहे. पण काही लोकांना अजून पैसे मिळाले नसावेत आणि अजितदादा गटाचे लोक त्यांना म्हणत असतील थांब तुला काहीतरी पाठवतो मग मतदानाला जा. यामुळे मतदान कमी होत असावं अशी शक्यता रोहित पवारांनी व्यक्त केली.

Rohit Pawar ..तर अजितदादांवर कारवाई झाली पाहिजे

आता आम्हाला अशी भीती आहे की दुपारी तीन साडेतीन वाजल्यापासून अजितदादांच्या गुंडांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात करतील. त्यामुळे आम्ही याबाबत पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. आम्ही सुद्धा व्हिडिओ शुटींग करणार आहोत आणि जर तसं घडलं तर अजित पवारांवर कारवाई झाली पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar सुळेंना काकींची भेट घेतली त्यात काय चुकलं?

सुप्रिया सुळे काटेवाडीत मतदानानंतर काटेवाडीत आशा काकींना भेटायला गेल्या होत्या. आता जर त्यांच्या मुलाने स्वार्थी भूमिका घेतली असेल तर त्यात आईचं काय चुकलं. त्यामुळे आज सुप्रिया सुळे यांनी आशा काकींची भेट घेत संस्कृती जपली. त्यामुळे भेट घेतली यात काय चुकलं असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

आचारसंहितेत अडकला “आनंदाचा शिधा”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img