बारामती
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या टप्प्यातील सर्वाधिक हायव्होल्टेज लोकसभा मतदारसंघ असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातील शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) थेट मतदानाच्या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामती येथील निवासस्थाने दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या बारामती निवासस्थाने अजित पवार यांच्या मातोश्री यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी अजित पवार देखील निवासस्थाने उपस्थित होते. त्यामुळे या भेटीमागे नेमके काय दडलं असे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या थेट सामना रंगला होता अनेक आरोप प्रत्यारोप देखील शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवार यांनी केले होते त्यानंतर अचानक मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे घर गाठल्याने या भेटीची चांगली चर्चा रंगली आहे. या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात 11 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. तर देशात 96 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे.