23.1 C
New York

Sunita Williams: सुनीता विल्यम्सचा तिसरा अंतराळ प्रवास रद्द! नेमकं घडलं काय?

Published:

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) तिसऱ्यांदा अंतराळात जाण्यासाठी सज्ज. मात्र, सुनीता यांचा तिसरा अंतराळ प्रवास काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आला आहे. प्रक्षेपणाची नवी तारीख अद्याप जाहीर झाली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, यानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहेत.

अंतराळात घेऊन जाणाऱ्या बोईंग स्टारलाइनरचे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. सुनीता विल्यम्स पून्हा अंतराळ यांमध्ये आकाशात पोहोचण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. भारतीय वेळेनुसार सकाळी ८.०४ वाजता फ्लोरिडाच्या केप कॅनवेरल येथील केनेडी स्पेस सेंटरमधून बोइंग स्टारलाइनर उड्डाणासाठी सज्ज झाले होते. परंतु, लिफ्ट-ऑफच्या अवघ्या 90 मिनिटांपूर्वी, ॲटलस व्ही रॉकेटचे प्रक्षेपण मागे घेण्यात आले. यूएस स्पेस एजन्सी नासाकडून घोषित करण्यात आले की, ऑक्सिजन रिलीफ वाल्ववर नाममात्र अट होती, ज्यामुळे हि अंतराळ यात्रा पुढे ढकलण्यात आली.

पैसा… नुसता पैसा… झारखंडमध्ये मंत्र्याच्या नोकराकडे सापडले मोठे घबाड


सुनीता विल्यम्स आणि नासाचे बॅरी विल्मोर हे दोघे अंतराळात उड्डाण करणार होते. त्यांना सुरक्षितपणे अंतराळयानातून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे या मोहिमेचे यश इलॉन मस्क यांच्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे. भारतीय वंशाच्या सुनीता यांच्यासाठी हा तिसरा अंतराळ प्रवास ठरला असता. त्यांनी या आधी अंतराळात ३२२ दिवस घालवले होते. सुनीता यांची पहिली अंतराळ यात्रा ९ डिसेंबर २००६ रोजी सुरु झाली होती जी २२ जून २००७ पर्यंत संपली. त्यांनी २९ तास १७ मिनिटांपर्यंत चार स्पेसवॉक करून महिलांसाठी जागतिक विक्रम केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img