19.7 C
New York

Sangram Jagtap : संग्राम पाटील यांनी केलं मतदारांना ‘हे’ आवाहन

Published:

अहमदनगर

देशभरात 4 जून रोजी महाशक्तीचा जो उस्तव साजरा होणार आहे. त्या उत्सवात आपल्याला सहभागी व्हायचे आहे असा विश्वास व्यक्त करत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी सुजय विखे (Sujay Vikhe) यांचा विजय होईल असा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे लोकसभेचे (Ahmednagar Loksabha) महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होत. त्यामध्ये ते बोलत होते.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

आपल्याला मोदींना सहकार्य करून देशभरात दाखऊन द्यायचं आहे की, अहमदनगर जिल्हा किती भक्कपणे मोदी यांच्या पाठिमागे आहे असंही संग्राम पाटील यावेळी म्हणाले. व्यासपिठावर यावेळी उमेदवार सुजय विखे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, शिवाजीरावर कर्डीले यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

देशाचं नेतृत्व निवडण्याची निवडणूक

ही निवडणूक ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार अशी नसून ही निवडणूक देशाचं नेतृत्व निवडण्याची आहे. त्यामुळे आपण थोडा विचार करून मतदान करायला हवं असं आवाहनही संग्राम पाटील यांनी उपस्थितांना केलं. तसंच, आज देशाचं नेतृत्व कुणाच्या हातात म्हटलं की लोक मोदींच्या हातात असं म्हणतात असंही संग्राम पाटील यावेळी म्हणाले आहेत. आपण अहमदनगर आणि शिर्डी अशा दोन्ही उमेदवारांना विजयी करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

कुणाला मतदान करावं हे सांगण्याची गरज नाही

आज देशाच्या विकासावर आपण बोललो तर देशभरात मोदींमुळे अनेक ठिकाणी विकास झाला आहे. तसंच, मागच्या दहा वर्षांत मोदींनी विकासाचं कामं झाले असल्याचा दावाही संग्राम पाटील यांनी यावेळी केला आहे. असा विकास केल्यामुळे आपण कुणाला मतदान करावं हे सांगण्याची गरज नाही असं म्हणत संग्राम पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन यावेळी केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img