महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख पत्नी जिनिलियासह (Ritesh-Genelia) मतदान करण्यास सज्ज. दोघांनी लातूरमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांचे राजकारणाशी फार जुने नाते आहे. रितेशचे वडील स्व. विलासराव देशमुख यांनी बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. मात्र रितेश कायम राजकारणापासून दूर राहिले. रितेशची दोन्ही भावंडे राजकारणात आहे. राजकारणात येण्याबाबत रितेशला प्रश्न विचारला असता त्याने कायमच माझे दोन भाऊ असताना माझी काय गरज असे उत्तर दिले आहे.
आनंद दिघेंच्या संपत्तीवर उद्धव ठाकरेंचा डोळा मुख्यमंत्र्यांचा आरोप
रितेश-जिनिलियाने (Genelia Deshmukh) लातूरमध्ये (Latur) मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत रितेश म्हणाला, “आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा. मी फक्त आज मतदान करण्यासाठी मुंबईहून लातूरला आलो आहे. आज रात्री परत ट्रेन पकडून पुन्हा मुंबईला जाणार आहे. उन्हाळा वाढत आहे परंतु एक दिवस थोडा त्रास आपण आपल्या देशासाठी सहन करु शकतो. प्रत्येकाला वाटते की एका मतदानाने काय फरक पडणार पण तुमचे एक मत महत्त्वाचे आहे.”
रितेश आणि जिनिलिया हे फक्त महाराष्ट्र नाही तर अवघ्या बॉलीवूडची देखील लाडकी जोडी आहे. त्यांचा साधेपणा नेहमी चाहत्यांना भावतो. रितेश यापूर्वी देखील लातूरला कुटुंबासोबत गेल्याचे अनेक गंमतीशीर फोटोज आणि व्हिडिओने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज देखील लातूरला मतदानासाठी ट्रेनने प्रवास करत आले आहेत. त्यामुळे रितेशचे कौतुक होत आहे.