26.6 C
New York

Rajan Vichare : राजन विचारेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Published:

ठाणे

मी अजूनही प्रामाणिक आहे तुमच्यासारखा गद्दार झालेलो नाही. मला बोलायला लावू नका. तुमची उरलीसुरली राहू द्या. नरेश म्हस्के (Naresh Mhaske) काँग्रेसमध्ये (Congress) जात होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले म्हणून तो थांबला. याच म्हस्केला मी घेऊन आलो होतो, अशा शब्दांत ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा (Thane Lokabha) मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. राजन विचारे यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिले.

राजन विचारे म्हणाले, मला शिवसेनेत 40 वर्ष झाली यांचा उदय दिघे साहेबांनंतरचा आहे. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते, मोठं वादळ येऊन सुद्धा त्यांनी पक्ष एकसंघ ठेवला होता. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता, पहिली सत्ता या ठाण्यानेच शिवसेनेला मिळवून दिली होती. 2014 च्या निवडणुकीला ठाण्यातील सैन्य घेऊन ते त्यांच्या मुलासाठी कल्याणला गेले. मी एकटा राहून इथून निवडून आलो, ते आणि त्यांचा मुलगा एवढंच त्यांचं समर्पण होतं. मी सामान्य कार्यकर्ता कधीच पैसे खर्च करुन आलो नाही, माझ्याकडे तेव्हा खोके नव्हते.

राजन विचारे म्हणाले, तुम्हाला शिवसेना संपवायची होती. सर्वांना माहित आहे राजन विचारे काय आणि म्हस्के काय आहे. तुम्ही धर्मवीर पिक्चर काढला त्यासाठी तुम्ही पैसे काढले नाही. कार्यकर्त्यांनी खिशातून पैसे काढले. तुम्ही फक्त महापालिकेत टेंडरचे पैसे खाण्याच काम केलं. पालिका खाली केली असा गंभीर आरोप विचारे यांनी केला. आम्ही बोलत नाही आणि आम्हाला बोलायलाही लावू नका. तुमची जी आहे ती राहू द्या. मी अजूनही प्रामाणिक आहे तुमच्यासारखा गद्दार झालेलो नाही.

राजन विचारे म्हणाले, एकनाथ शिंदेला कंटाळून नरेश म्हस्के चालला होता. चार आणि पाच आमदार घेऊन हा माणुस काँग्रेसमध्ये जात होता हे फक्त पक्ष फोडून सेटिंग करत राहिले. कोरोना काळात म्हस्के होते कुठे? मनसेने आंदोलन केल्यावर बाहेर पडले. सत्तेच्या जोरावर शाखा ताब्यात घेतल्या. दिघे साहेबांच्या ऑफिसला कधीच नावं नव्हत तुम्ही तुमचं नावं तिथं दिलं. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळालं. तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री पण ठाण्यासाठी काय केलं ते सांगा असा सवाल विचारे यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img