22.3 C
New York

PM Modi : पंतप्रधान मोदींनी रेवण्णा प्रकरणी मांडले परखड मत

Published:

जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमुख आणि देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे मोठा गोंधळ उडाला असून विरोधकांनी या प्रकरणावरू भाजापाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकताच टाईम्सनाऊला मुलाखत दिली. यादरमयान विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना प्रज्वल रेवण्णा प्रकरणाविषयी विचारण्यात आलं असता, प्रज्वल रेवण्णा सारख्या लोकांविरोधात Zero Tolerance चे धोरण अवलंबले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी हे व्हिडीओ बाहेर येण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

PM Modi नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली

यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली. प्रज्वल रेवण्णा देशाबाहेर गेल्यानंतर त्याचे व्हिडीओ प्रसारित करण्यात आले. त्यापूर्वी त्याला कर्नाटक सोडून जाण्याची परवानगी देण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकार संशायस्पद आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली. पुढे नरेंद्र मोदी असे म्हणाले की, “कर्नाटक सरकारने प्रज्वलला देश सोडण्याची परवानगी दिली. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. गुजरातमध्ये ही घटना घडली असती तर त्याला गुजरात सरकार जबाबदार असते, तसेच कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशात झाल्यास त्याला तिकडचे राज्य सरकार जबाबदार असते. या प्रकरणी कठोर पावले उचलण्याची जबाबदारी कर्नाटक सरकारची होती,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर केली आहे.

रितेश-जिनिलियाने केले मतदान; रितेशच्या वक्तव्याची चर्चा!


PM Modi रेवण्णा यांच्या प्रकरणी काही व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकमधील प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल व्हिडीओ प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाची पंचाईत झाली आहे. भाजपाच्या मित्रपक्षातील उमेदवारावरच इतका गंभीर आरोप झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रज्वल रेवण्णा हे हसन लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. जेडीएस आणि भाजपने राज्यात युती केली आहे. युतीकडून त्यांना हसन लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. याच दरम्यान रेवण्णा यांच्या प्रकरणी काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे रेवण्णा हे अडचणीत सापडले आहेत. रेवण्णा देश सोडून पळून गेले असून ते जर्मनीमध्ये असल्याचं कळतंय. प्रज्वल यांच्या वडिलांना पोलिसांकडून अटक झाली आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात देखील ब्लू कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे.

PM Modi कायदेशीर पर्याय उपलब्ध आहे

“प्रश्न जो पर्यंत मोदींचा आहे, भाजपा आहे, आपल्या संविधानाचा प्रश्न आहे तर, माझे स्पष्ट मत आहे की, अशा लोकांविरुद्ध शून्य सहनशीलता असली पाहिजे. यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत,” असे परखड मत नरेंद्र मोदींनी मांडले. “एकाच वेळी समोर आलेल्या हजारो व्हिडीओतून हे लक्षात येतं की या एकाच दिवसातील व्हिडीओ नाहीत. हे व्हिडीओ जेडी(एस) काँग्रेससोबत युतीत होते तेव्हापासूनचे आहेत. हे व्हिडीओ ते सत्तेत असताना गोळा करण्यात आले होते आणि आता ते निवडणुकीच्या वेळी समोर आणले गेले,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. त्याला देशाबाहेर पाठवल्यानंतर व्हिडिओ समोर आले. राज्य सरकारला माहिती असती तर त्यांनी पाळत ठेवायला हवी होती आणि विमानतळावर लक्ष ठेवायला हवे होते, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

प्रज्वल रेवण्णा हे हसन लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. जेडीएस आणि भाजपाने राज्यात युती केली आहे. युतीकडून त्यांना हसन लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. याच दरम्यान रेवण्णा यांच्या प्रकरणी काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे रेवण्णा हे अडचणीत सापडले आहेत. रेवण्णा देश सोडून पळून गेले असून ते जर्मनीमध्ये असल्याची माहिती आहे. रेवण्णा यांचे कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. हे व्हिडिओ हजारोंच्या संख्येने असून प्रज्वल यांच्या वडिलांना पोलिसांकडून अटक झाली आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात देखील ब्लू कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे.

मतदानासाठी कोणते १२ पुरावे धरले जातील ग्राह्य?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img