22.3 C
New York

Loksabha Election : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Published:

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी राज्यातील 11 मतदारसंघामध्ये मतदान सुरू झाले. दुपारपर्यंत मतदानाचा वेग मंद होता. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मतदान जास्त झाले, पण अन्य मतदारसंघांमध्ये तुलनेने मतदान कमी झाले. या टप्प्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), सुप्रिया सुळे (Supriya Sule), सोलापूरमधून प्रणिती शिंदे (Praniti Shinde), धाराशिवमधून खासदार ओमराजे निंबाळकर, माढा येथून रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते यांच्यासह साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), कोल्हापूरचे राजे श्रीमंत शाहू छत्रपती (Shahu Maharaj) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Loksabha Election : नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, माढा, पुणे, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले आणि सिंधुदुर्ग – रत्नागिरी या कोकणातील मतदारसंघात आज मतदान होत आहे. सिंधुदुर्ग – रत्नागिरीत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. 2019 च्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा पराभव केला होता. 2019 ला राणेंनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केला होता. त्यातून निलेश राणे निवडणूक लढले होते. पण शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले. आता यावेळच्या निवडणुकीत राणे भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपसह राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडी संपूर्ण आरक्षण मुस्लिमांना देणार’, मोदींचा आरोप

Loksabha Election : बारामतीत नणंद – भावजय

बारामतीत नणंद – भावजय असा कुटुंबातच मुकाबला होत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक जितकी महायुतीच्या प्रतिष्ठेची आहे, तितकीच शरद पवार यांच्यासाठी अस्तित्वाची आहे. पण, येथे दुपारी 1 पर्यंत मतदान केवळ 28 टक्के इतकेच झाले होते. सायंकाळपर्यंत त्यात वाढ अपेक्षित आहे. पण, मतदान कमी झाल्यास त्याचा फटका कोणाला बसणार, हे सांगणे अवघड होणार आहे.

सांगली मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे आव्हान आहे. चंद्रहार पाटील हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असेल तरी त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्याचेच दिसून आले आहे. त्यामुळे ही लढत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि विद्यमान खासदार खासदार संजयकाका पाटील यांच्यातच होणार, हे स्पष्ट आहे. सांगलीतील मतदानाचा टक्का चांगला आहे. अंतिम मतदानाचा टक्का वाढला तर मात्र संजयकाका पाटील यांच्यासाठी ती धोक्याची घंटा असेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img