21 C
New York

Loksabha : हातकणंगलेत महायुती-मविआच्या कार्यकर्त्यांत राडा

Published:

कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघावर आज मतदान सुरू आहे. या दरम्यान हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Loksabha) मतदारसंघातील मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीचे (Mahayuti) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमांक 62 आणि 63 वर हा प्रकार घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करत भांडणाऱ्या कार्यकर्त्यांना बुथमधून बाहेर काढल्याने तणाव निवळला. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधींवर कारवाई करावी, अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते. यावरून सत्यजित पाटील सरूडकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जाब विचारला असता दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांनी हस्तक्षेप झाल्यानंतर आता सध्या मतदान सुरळीत सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img