17.3 C
New York

Loksabha Elections : राज्यात दुपारी 1 पर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात 11 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज 7 में 2024 रोजी सकाळी 7 वा.पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 मतदार संघात मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55  टक्के मतदान झाले आहे.

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

लातूर – ३२.७१ टक्के
सांगली – २९.६५ टक्के
बारामती – २७.५५ टक्के
हातकणंगले – ३६.१७ टक्के
कोल्हापूर – ३८.४२ टक्के
माढा – २६.६१ टक्के
उस्मानाबाद – ३०.५४ टक्के
रायगड – ३१.३४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के
सातारा – ३२.७८ टक्के
सोलापूर – २९.३२ टक्के

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img