मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. एकूण 93 जागांवर मतदान होत आहे. त्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) 11 जागा आहे. राज्यात नव्हे तर देशात सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान (Voting) आज पार पडत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज 7 में 2024 रोजी सकाळी 7 वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 मतदार संघात मतदार संघात दुुपारी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान झाले आहे.
सांगोल्यातील जाळण्यात आलेल्या मशीनच्या बदल्यात नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन
राज्यात नव्हे तर देशात सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहेत. तर धाराशीवमध्ये पैसे आणि दारु वाटप केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगोल्यातील जाळण्यात आलेल्या मशीनच्या बदल्यात नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बसविण्यात आले. संबंधित मतदान केंद्रावर शांतता असून सुरळीत मतदान सुरू आहे. जे मशीन जळाले आहेत त्यावरील मतदान मोजता येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान घेण्याची कोणतीही गरज नाही. सांगोल्यात ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलीय. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एका युवकाने ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला होता.
माढा लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न
माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्या तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदार केंद्रावरती मतदारांनी ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सांगोला पोलीस ठाण्यात सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ५५.३८ टक्के
सांगली – ५२.५६ टक्के
बारामती – ४५.६८ टक्के
हातकणंगले – ६२.१८ टक्के
कोल्हापूर – ६३.७१ टक्के
माढा – ५०.०० टक्के
उस्मानाबाद – ५२.७८ टक्के
रायगड – ५०.३१ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के
सातारा – ५४.११ टक्के
सोलापूर – ४९.१७ टक्के